वर्धा,
mahavitaran-employees-on-strike : खाजगीकरणासह विविध मागण्यांसाठी राज्यातील महावितरणच्या कर्मचार्यांनी आज गुरुवार ९ ऑटोबरपासून संप पुकारला आहे. या संपात जिल्ह्यातील ३५० कर्मचारी सहभागी झाले आहे. तीन दिवसाच्या संप काळात महावितरणची पूर्ण धुरा कंत्राटी कर्मचार्यांवर राहणार आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीच्या वतीने हा संप पुकारण्यात आला आहे. स्थानिक महावितरणच्या कर्मचार्यांनी बोरगाव (मेघे) येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर घोषणा दिल्या. यात महावितरण, महापारेषण, महानिर्मिती कंपनीतील विविध मार्गाने होणार्या खाजगीकरणाला विरोध केला. महानिर्मितीच्या ताब्यातील जलविद्युत प्रकल्पाचे खाजगीकरण, महापारेषण मधील टीबीसीबीच्या माध्यमातून खाजगीकरण, महावितरणमधील ३२९ उपकेंद्रांचे खाजगीकरण, समांतर वीज परवान्याला विरोध केला, महावितरण कंपनीमधील एकतर्फी पुनर्रचनेला संघटनेने विरोध केला आहे. तर राज्य शासनाने मंजूर केलेली पेन्शन योजना लागू करा, मागासवर्गीयांना पूर्वलक्षी प्रभावाने पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करा, तीनही कंपनीतील वर्ग ३ ते ४ स्तरावरील संवर्गनिहाय रित पदे सरळसेवा भरती, पदेान्नती व अंतर्गत भरतीद्वारे मूळ बी. आर प्रमाणे भरा, कंत्राटी कामगारांना कायम नोकरीत समाविष्ट करा, आदी मागण्यांचा समावेश आहे.
या आंदोलनात महाराष्ट्र राज्य स्टेट इलेट्रिसिटी वर्कस फेडरेशन, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, सबॉर्डिनेट इजिनीयकर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस इंटक, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन, महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कस युनियन, तांत्रिक कामगार युनियन आदींचा सहभाग आहे.