वर्धा,
unnatural-torture-case : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणारा आरोपी समीउल्ला खान अब्दुल हमीद खान (२५) रा. आनंदनगर याला २० वर्षांचा सश्रम कारावास आणि दंड ठोठावला. हा निर्वाळा येथील जिल्हा न्यायाधीश-३ एस. एम. मेनजोगे यांनी दिला.
घटनेची थोडयात हकीगत अशी की, फिर्यादीच्या घरा समोर मदिना मशिद आहे. त्या मशिदमध्ये आरोपी समीउल्ला खान अब्दुल हमीद खान/हाफीज साहाब राहतात. १९ ऑटोबर २०२१ रोजी पीडित मुलगा हा त्याच्या घरी झोपला होता. अरमान हा पीडिताच्या घराच्या बाजूला राहतो. अरमान याने फिर्यादीला सांगितले की, आरोपी हा पीडित मुलाला मशिदीत बोलवत आहे. त्यामुळे पीडिताला फिर्यादीने मशिदीत जाण्यास सांगितले. पीडित हा एकटा मशिदीत गेला. यानंतर आरोपीने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. घडलेला प्रकाराबाबत कुणाला सांगितल्यास मारण्याची धमकी दिली. यानंतर पीडिताने घडलेल्या प्रकाराची माहिती घरी दिली.
तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक प्रिती आडे व अनुराधा फुकट यांनी केला. आरोपीने गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्यामुळे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील गिरीश तकवाले व अतिरीक्त सरकारी वकील विनय घुडे यांनी कामकाज पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी नारंगी वाढई यांनी साक्षीदारांना न्यायालयात हजर करून मोलाची कामगीरी बजावली.