पाच वर्षीय इनायानेही घेतला अखेरचा श्वास

एका कुटुंबातील पाचजणांचा दुर्दैवी मृत्यू

    दिनांक :01-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
वणी, 
accident-vani-ghuggus-road : 31 ऑक्टोबरचा वणी-घुग्गुस मार्गावर झालेल्या भीषण अपघातात रियाजुद्दीन शेख (वय 55) व त्यांच्या तीन मुलींचा दुर्दैवी अंत झाला होता. इनाया शारिक शेख या पाच वर्षांच्या पुतणी गंभीर जखमी अवस्थेत तिला आधी चंद्रपूरला व नंतर नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु या चिमुकलीनेसुद्धा 1 नोव्हेंबरला पहाटे या जगाचा निरोप घेतला. 31 ला रात्री उशीरा चौघांवर अंत्यविधी पार पडला. या घटनेने परिसरात सर्वत्र शोककळा पसरली.
 
 
y1Nov-Inaya
 
रियाजुद्दीन शेख (वय 55) हे सकाळी त्यांची मोठी मुलगी मायरा (वय 18) हिला कार चालवायला शिकवायला तिच्या दोन लहान बहिणी जोया (वय 12) आणि अनिबा (वय 11) आणि पुतणी इनाया (वय 5) यांना घेऊन घुग्गुस-वणी मार्गावर गेले होते. सकाळी सुमारे 10.45 वाजता एम एच 01 ए एच 5700 या स्कोडा कारचे नियंत्रण सुटले. कार डिव्हायडर वरुन उडत समोरून येणाèया एम एच 40 ए के 0358 या ट्रकला धडकली. अपघात इतका भीषण होता की कारचा ड्रायव्हर साईडचा भाग पूर्णतः चक्काचूर झाला.
 
 
या अपघातात मायरा, जोया, अमिबा यांचा जागीच मृत्यू झाला तर रियाज शेख हे किरकोळ जखमी होते, परंतु आपल्या डोळ्यासमोर घडलेले हे भीषण दृश्य ते सहन करू शकले नाहीत. उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचाही मृत्यू झाला. 31 ला रात्री उशिरा त्या चारही जणांवर अंत्यविधी प्रकिया पार पडली. इनाया हिला उपचारासाठी नागपुर ला रेफर करण्यात आले होते. तिथे उपचार सुरु असताना तिनेसुद्धा दि. 01 ला पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान जगाचा निरोप घेतला. या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेनंतर संपूर्ण वणी शहरात शोककळा पसरली आहे.