आजनसरा भतीचा मार्ग सुकर; बससेवा सुरू

*ना. बावनकुळे यांनी घेतली निवेदनाची दखल

    दिनांक :01-Nov-2025
Total Views |
आजनसरा, 
chandrashekhar-bawankule : हिंगणघाट तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असणार्‍या आजनसरा येथे दर्शनासाठी येणार्‍या भाविकांकरिता नागपूर ते आजनसरा थेट बस सेवा सुरू करण्याची मागणी देवस्थानचे अध्यक्ष डॉ. विजय पर्बत, सरपंच श्रावण काचोळे, सामाजिक कार्यकर्ते संजय कोसूरकर यांनी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन नागपूर ते आजनसरा थेट बस सेवा सुरू करण्यासाठी निवेदन दिले होते. ना. बावनकुळे यांनी तात्काळ दखल घेऊन राज्य परिवहन महामंडळाचे नागपूर प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गभणे यांना हिंगणघाट नागपूर आजनसरा थेट बससेवा सुरू करण्याच्या सूचना दिल्याने नागपूर येथील भतांचा आजनसरा येथील मार्ग सुकर झाला आहे.
 

SDF 
 
आजनसरा हे संत भोजाजी महाराजांना अर्पण करण्यात येणार्‍या पुरण पोळी प्रसादाचे राज्यातील एकमेव तीर्थक्षेत्र असून या स्थळाला अध्यक्ष डॉ. विजय पर्बत व विश्वस्त मंडळाच्या प्रयत्नातून राज्यशासनाच्या पर्यटन विभागाचा ’ब’ दर्जा प्राप्त झाला आहे. येथे विदर्भातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. नागपूर येथुन येणार्‍या भाविकांना हिंगणघाटवरून बसची वाट पाहत येथे यावे लागत होते. त्यामुळे नागपूर- आजनसरा बस सुरू करण्याची मागणी डॉ. पर्बत यांनी ना. बावनकुळे यांना केली होती. त्या मागणीची दखल घेत या मार्गांवर थेट बस सेवा सुरू करण्यात आली. या बसचा मार्ग बुट्टीबोरी, सोनेगाव, कांढळी जाम हिंगणघाट, वडनेर, आजनसरा असा आहे. ही बस नागपूरवरून आजनसरासाठी सकाळी ८ वाजता व आजनसरा वरून सकाळी १० वाजता व सायंकाळी ५ वाजता नागपूरसाठी सुटणार आहे. ही थेट बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांसह भाविक भतांना मोठा दिलासा मिळाला आहे.