मुख्यमंत्री फडणवीस यांचा वणीकरांना दिलासा

माजी आमदार बोदकुरवार यांच्या पाठपुराव्याला यश

    दिनांक :01-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
वणी, 
devendra-fadnavis-vani : वणी शहरातील नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. वणी नगर परिषदेकडून वर्ष 2025-26 ते 2028-29 या आर्थिक वर्षाकरिता प्रस्तावित करण्यात आलेल्या चतुर्थ वार्षिक कर मूल्यांकनास मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. वाढीव घर कर रद्द करण्यात यावा याकरिता माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यासह भाजपा पदाधिकाèयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते.
 
 
y1Nov-Wani-N.-P.
 
वणी नगर परिषदेकडून काही दिवसांपूर्वी नागरिकांना नवीन कर मूल्यांकनाच्या सूचना पाठविण्यात आल्या होत्या. या प्रस्तावात चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत काही ठिकाणी करात 3 ते 4 पट तर काही ठिकाणी तब्बल 6 पट वाढ करण्यात आली होती. ही वाढ महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 मधील तरतुदींना विरोधात असून नागरिकांच्या आर्थिक स्थितीवर अन्यायकारक भार टाकणारी असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती.
 
 
या पार्श्वभूमीवर माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाèयांनी 13 ऑक्टोबर 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वणी नगर परिषदेच्या प्रस्तावित कर आकारणीस स्थगिती देण्याची मागणी केली होती.
 
 
त्यावर तत्परतेने कार्यवाही करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित प्रस्तावास स्थगिती देण्याचे आदेश पारित केले असून मुख्यमंत्री सचिवालयाकडून वणी नगर परिषदेला याबाबत अधिकृतपणे कळविण्यात आले आहे.