शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा

युवक काँग्रेस कमिटी कडून विविध मागणीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

    दिनांक :01-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
झरीजामणी, 
farmers-loan-waiver : महाराष्ट्रातील शेतकरी आजही कर्जाच्या विळख्यात अडकले आहेत. शेतमालाला योग्य दर न मिळाल्याने आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेती तोट्यात जात आहे. या सर्व पृष्ठभूमिवर राज्यातील सर्व शेतकèयांना सरसकट कर्जमाफीसह इतर माण्यांचे निवेदन युवक काँग्रेस कमिटीकडून मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
 
 
y1Nov-Inaya
 
सरसकट कर्जमुक्ती देण्यात यावी आणि शेतमालाला हमीभाव कायदा लागू करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. या मोर्चाकडे राज्यातील शेतकèयांचे लक्ष लागले आहे. एकमेव मागणीसाठी राज्यातील शेतकरी एकवटले असून राज्य सरकारने जाहीर केलेली मागणी मान्य करावी यासाठी यासाठी राज्यातील अनेक संघटना शेतकरी नेते बच्चु कडू यांच्या सोबत आहे.
 
 
या मागण्या मंजूर करण्यात याव्या यासाठी झरी युवक काँग्रेस वणी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष राहुल दांडेकर व सरपंच संघटनेचे अध्यक्ष निलेश एलटीवार यांच्या नेतृत्वामध्ये तहसीलदार अक्षय रासने यांचे मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे विविध मागण्याचे निवेदन पाठवण्यात आले.
 
 
निवेदनात नमूद केलेल्या मागण्यांमध्ये महाराष्ट्रातील सर्व शेतकèयांची संपूर्ण सरसकट कर्जमुक्ती, शेतीमालाला हमीभाव कायदा लागू करणे, शासनाने जाहीर केलेले अतिवृष्टीचे 18,500 रुपये प्रति हेक्टर अनुदान तत्काळ देणे, प्रत्येक शेतकèयाला 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, रबी पिकासाठी 20 हजार रुपयांची मदत जाहीर करावी, सीसीआय कापूस नोंदणीची तारीख वाढवावी, शासनाने 8 हजार 500 रुपये तूटपुंजी मदत केली असून शेतकèयांना वाढीव अनुदान देण्यात यावे अशी मागणी निवेदनातून केली आहे.
 
 
निवेदन देताना अशोक पंधरे, हरिदास गुरुजलवार, बळीराम पेंदोर, मिथुन सोयाम, निखिल चौधरी, करमचंद बघिले, अशोक शरलावार, श्रीकांत अनमुलवार, संजय कुरमचेटीवार, राजू उपरे, संतोष जंगीलवार, झरी तालुक्यातील शेतकरी, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.