बाळासाहेब आंबेडकरांवर आक्षेपार्ह चलचित्र

वंचित आघाडीची पोलिसांत तक्रार

    दिनांक :01-Nov-2025
Total Views |
तिवसा, 
Balasaheb Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अपमानजनक तथा आक्षेपार्ह वक्तव्य करणारे व्हिडिओ पोस्ट करणार्‍यांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तिवसा तालुका वंचित बहुजन आघाडीने केली असून तसा रीतसर तक्रार अर्ज युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी तिवसा पोलिस स्टेशनमध्ये दाखल केला आहे.
 

J K 
 
समाज माध्यमावरील एका फेसबुक पेजवरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि जातीयवादी टिपण्णी असलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, २४ ऑक्टोबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या घटनेनंतर ‘राजकारण विदर्भाचे’ या फेसबुक पेजवरून एक आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सागर भवते यांनी तक्रारीत केला आहे. सागर भवते यांना आलेल्या एका लिंकमध्ये हा व्हिडिओ होता. व्हिडिओमध्ये अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह जातीवाचक शब्दांचा प्रयोग करण्यात आला आहे. हे कृत्य मानहानीकारक असून सामाजिक सलोखा बिघडवणारे आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत सागर भवते यांनी पोलिस निरीक्षकांची भेट घेऊन तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यांनी ‘राजकारण विदर्भाचे’ या फेसबुक ग्रुपचे सर्व अ‍ॅडमिन तसेच व्हिडिओशी संबंधित सर्व व्यक्तींवर माहिती तंत्रज्ञान अधिनियम, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार व इतर कायदेशीर कलमांखाली त्वरित गुन्हा नोंद करावा, अशी मागणी केली आहे.