घाटंजीत जिव्हाळ्याची भिंत उपक्रमांतर्गत गरजूंना 50 ब्लँकेटचे वाटप

    दिनांक :01-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
घाटंजी,
blanket distribution सामाजिक बांधिलकीची परंपरा जपणाèया जिव्हाळ्याची भिंत या सुप्रसिद्ध सामाजिक संस्थेतर्फे आज अत्यंत उपयुक्त आणि हृदयस्पर्शी उपक्रम राबविण्यात आला. थंडीच्या प्रारंभी गरजू व गरीब नागरिकांना उबदार आश्रय मिळावा, या हेतूने 50 ब्लँकेटचे वितरण करण्यात आले.
 
 
 
blanket distribution
 
या उपक्रमाचे आयोजन भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ (भारत) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यामध्ये अमरावती विभागीय अध्यक्ष विजय बुंदेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यवतमाळ जिल्हाध्यक्ष डॉ. दीपक घरझोडे यांच्या प्रेरणेने हा उपक्रम पार पडला.जिव्हाळ्याची भिंत संस्थेचे प्रकल्प अधिकारी सूरज हेमके यांनी या वाटप उपक्रमाचे आयोजन केले. त्यांच्या समाजोपयोगी कार्याचे सर्व उपस्थितांनी कौतुक केले. या प्रसंगी घाटंजी येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते बंडूभाऊ तोडसाम तसेच अनेक स्थानिक कार्यकर्ते, समाजसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान blanket distribution बोलताना विजयकुमार बुंदेला यांनी सांगितले की, थंडीच्या दिवसांत गरजूंना उबदार वस्त्र देणे ही खरी मानवसेवा आहे. अशा उपक्रमांतून समाजात संवेदनशीलता आणि आपुलकीचा संदेश जातो. डॉ. दीपक घरझोडे जिव्हाळ्याची भिंतचे अभिनंदन करताना म्हणाले, सामाजिक जबाबदारीची भावना जोपासणाèया अशा संस्थाच समाजातील दुर्बल घटकांसाठी आधारस्तंभ ठरतात. उपक्रमाचे सूत्रसंचालन सूरज हेमके यांनी केले, तर आभारप्रदर्शन बंडू तोडसाम यांनी मानले.कार्यक्रमासाठी जिव्हाळ्याची भिंत संस्थेचे सर्व सदस्य, स्वयंसेवक व स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले. हा उपक्रम समाजातील दया, करुणा आणि एकतेचा सुंदर संदेश देणारा ठरला.