‘हॉटेल ताडोबा अतिथी इन’ येथील कुंटणखान्यावर धाड

*एका महिलेची सुटका *स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

    दिनांक :01-Nov-2025
Total Views |
चंद्रपूर, 
Hotel Tadoba Guest Inn : गस्तीवर असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेने लोहार येथील ‘हॉटेल ताडोबा अतिथी इन’ येथे चालविण्यात येत असलेल्या कुंटणखान्यावर धाड टाकत एका महिलेची सुटका केली. तसेच आरोपीला अटक केली.
 
 
J
 
31 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी त्यांना लकी नावाचा मुलगा हॉटेल ताडोबा अतिथी इन येथे स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता पीडित महिलांना हॉटेलमध्ये बोलावून कुंटणखाना चालवित आहे, अशी माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे हॉटेल ताडोबा अतिथी इन येथे धाड टाकली असता, आरोपी लकी उर्फ लक्ष्मण रामसिंह शर्मा (26, रा. अलवर, राजस्थान) हा हॉटेलमध्ये एका महिलेकडून स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता वेश्या व्यवसाय करून उपजीविका करीत असल्याचे निष्पन्न झाले. यावरून रामनगर पोलिस ठाण्यात कलम 3, 4, 5, 7 अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अमोल काचोरे, उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, सुनील गौरकर, सहायक फौजदार धनराज कारकाडे, पोलिस हवालदार सुरेंद्र महतो, दीपक डोंगरे, प्रफुल गारघटे, सुमित बरडे, शशांक बादमवार , किशोर वाकाटे आदींनी केली. कुंटणखाणे चालवू नयेत, अन्याय कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन सर्व लाजिंग व हॉटेल व्यावसायिकांना पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.