पत्नीस पोटगी न दिल्याने पतीस एक महिन्याची शिक्षा

    दिनांक :01-Nov-2025
Total Views |
मंगरूळनाथ,
alimony to wife घटस्फोट झालेल्या पत्नीस न्यायालयाने ठरवून दिलेली पोटगी रक्कम न भरल्याने पतीस एक महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा निर्णय मंगरूळनाथ येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने दिला. प्राप्त माहितीनुसार मोतीराम कुंडलिक काटेकर (वय ५५) रा. मालेगाव, जि. वाशीम यांच्याविरुद्ध त्यांच्या पत्नी वंदना मोतीराम काटेकर (वय ५०) रा. शहापुर खुर्द, ता. मंगरूळनाथ यांनी कलम १४७ बी. एन. एस. अंतर्गत पोटगी व नुकसानभरपाई संदर्भात प्रकरण दाखल केले होते.
 
 

पोटगी  
 
 
न्यायालयाने काटेकर यांना त्यांच्या पत्नीला दरमहा ३,५०० पोटगी, ५०० दवाखान्याचा खर्च, १,००० घरभाडे आणि २०,००० नुकसान भरपाई अशा मिळून दोन लाख चाळीस हजार रुपये रक्कम २५ नोव्हेंबर २०२१ ते २५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत देण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने त्यांना २९ ऑटोबर २०२५ रोजी स्वतः किंवा वकिलामार्फत हजर राहून ही रक्कम जमा करण्यास सांगितले होते.alimony to wife मात्र, आदेशानुसार पैसे न भरल्यामुळे न्यायालयाने मोतीराम काटेकर यांना एक महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. या प्रकरणात जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलिस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल क्षीरसागर यांनी कारवाईत केली.