जाम येथे बिबट्याचा मुतसंचार; शेतकर्‍यांमध्ये दहशत

    दिनांक :01-Nov-2025
Total Views |
समुद्रपूर,
jam-leopards : तालुक्यातील जाम मेनखात परिसरात बिबट्याच्या हालचालींनी गावकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल शुक्रवारी सायंकाळी विलास फ्रॉममध्ये बिबट्याचे ठसे आढळून आल्याने वनविभागाला कळवली. घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी राजेंद्र धनविज व वनरक्षक शशिकांत शेंद्रे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
 
 
K
 
जामचे पोलिस पाटील कवडू सोमलकर व गावकरी गोलू साठवणे, सागर वाटमोडे, शंकर दुर्गे, चिनू लडके आणि काही नागरिक यांनी पाहणी केली असता ते बिबट्याचे ठसे आहे याची खात्री झाली. काही दिवसांपूर्वी मेणखात येथील कुत्र्याला ठार करून ओढत नेले होते. गेल्या काही दिवसांपासून कारडा, मेणखात गावात जनावरांच्या हालचालीत अस्वस्थता आणि कुत्र्यांच्या आरडाओरड ऐकू येत होती. मात्र, जाम गावाजवळ बिबट्या येईल असे कोणी कल्पनाही केली नव्हती. वनविभागाने गावकर्‍यांना संध्याकाळनंतर घराबाहेर न जाण्याचे, लहान मुले व पाळीव प्राणी सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले आहे.