केरळ,
digital aaher Kerala सध्या तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येक क्षेत्रात वाढत असून, आता पारंपरिक कार्यक्रमांनाही त्याचा प्रभाव दिसू लागला आहे. केरळमध्ये एका वधूपित्याने लग्न समारंभात आहेर स्वीकारण्यासाठी अनोखी पद्धत अवलंबली आहे. समारंभादरम्यान वधूपित्याने आपल्या शर्टवर UPI QR कोड लावून पाहुण्यांकडून आहेर स्वीकारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

या घटनेमुळे digital aaher Kerala लग्नसमारंभात लिफाफ्यात पैसे देण्याची पारंपारिक पद्धत हळूहळू अपडेट होण्याची चर्चा सुरू झाली आहे. तंत्रज्ञानामुळे आहेर देणे अधिक सोयीचे, सुरक्षित आणि वेगवान झाले आहे.काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील वैजापूरमध्येही तंत्रज्ञानाचा वापर दिसून आला होता. येथे लंडनमध्ये राहणाऱ्या वरासोबत ऑनलाइन साखरपुडा पार पडला होता. या घटनांमुळे पारंपारिक विवाहप्रकारांवरही डिजिटल पद्धतींचा परिणाम स्पष्ट झाला आहे.विशेषत: युवा पिढीला डिजिटल पद्धतींचा स्वीकार अधिक सोपा आणि आकर्षक वाटत असल्यामुळे भविष्यात लग्नसमारंभांमध्ये असे नविन ट्रेंड अधिक दिसू शकतात. लग्नसमारंभात तंत्रज्ञानाचा वापर केवळ आर्थिक व्यवहारापुरता मर्यादित न राहता, आभासी उपस्थिती, ऑनलाइन आहेर आणि डिजिटल आमंत्रण यासारख्या नव्या संकल्पनांना चालना देत आहे.