गोंदिया,
korni-nadi-ghat : तालुक्यातील श्री विठ्ठल रुख्मीनी ट्रस्स्ट कोरनी/जिरूटोला व ग्रामवासीयांच्या वतीने ५ व ६ नोव्हेंबर रोजी श्री विठ्ठल रुख्मीनी मंदिर परिसर कोरनी/जिरूटोला विविध धार्मिक कार्यक्रम व यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ५ रोजी सकाळी १० वाजता हवन पूजन व प्रज्ञापिठाने कार्यक्रमाचा प्रारंभ होईल व संध्याकाळी ७ वाजता गंगा महाआरती होणार असून भाविकांनी कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन मंदिर ट्रस्टचे सचिव केतन तुरकर यांनी १ नोव्हेंबर रोजी येथे आयोजित पत्रपरिषदेतून केले आहे.
कोरनी येथील श्री विठ्ठल रुख्मीनी मंदिर हे सहा नद्यांचे संगमस्थळ असलेल्या वाघ नदीवर महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याच्या सिमेवर आहे. ३५ वर्षापूवी दिवंगत पाटील शिवशंकर तुरकर यांनी या मंदिराचे जिर्णोद्धार केले. येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्य दोन दिवस यात्रा मागील ३३ वर्षापासून भरते. तीनवर्षापूर्वी गंगा महाआरतीची सुरवात झाली. यंदा ४ थे वर्ष आहे. यानिमित्ताने ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता हवनपूजन प प्रज्ञापीठाने यात्रेचा प्रारंभ हाईल. यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम व संध्याकाळी ७ वाजता गंगा महाआरती हाईल.
यावेळी राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल, बालाघटच्या खा. भारती पारधी, आ. विनोद अग्रवाल, आ. विजय रहांगडाले, आ. राजकुमार बडोले, आ. संजय पुराम, माजी आ. राजेंद्र जैन आदींची उपस्थिती राहणार असल्याचे केतन तुरकर यांनी यावेळी सांगीतले. आरतीनंतर बालाघाट (मप्र) येथील शाहीर अमरलाल नागपूरे व गोविंदप्रसाद राऊत यांचा शाहीरी दुय्यम तमाशाची पर्वणी राहणार आहे. ६ नोव्हेंबर रोजी दिवसा विविध धार्मिक कार्यक्रम व रात्री ८ वाजता तालुक्यातील अर्जुनी येथील नुतन दंडार मंडळ व बालाघाट जिल्ह्यातील खैरी येथील अंकूर दंडार मंडळांची दंडार जुगलबंदीचा रसिकांना आनंद घेता येईल. भाविकांनी गंगा महाआरती, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहून लाभ घेण्यशचे आवाहन ट्रस्टचे सचिव केतन तुरकर, अध्यक्ष गोवर्धन पटले, उपाध्यक्ष रामलाल उईके, कोषाध्यक्ष नुतनलाल तुरकर, सहसचिव टेकचंद तुरकर, अनूज अग्रवाल आदिंनी केले आहे.