न्यू यॉर्कच्या महापौर निवडणुकीत मोदी ठरले केंद्रबिंदू

डेमोक्रॅट उमेदवाराचा अप्रत्यक्ष हल्ला

    दिनांक :01-Nov-2025
Total Views |
न्यू यॉर्क,
Modi at the center of New York elections अमेरिकेत सध्या न्यू यॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक रंगतदार टप्प्यात आली आहे आणि आश्चर्य म्हणजे या निवडणुकीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही चर्चेचा विषय बनले आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जोहराम ममदानी यांनी प्रचारसभेदरम्यान पंतप्रधान मोदींचा उल्लेख करत सध्याच्या महापौरांवर थेट टीका केली आहे. ममदानी यांनी न्यू यॉर्कमधील एका गुरुद्वारात बोलताना म्हटले की, शहरातील वाढत्या महागाईसाठी जबाबदार असलेले सध्याचे महापौर लोकांच्या अडचणी सोडवण्याऐवजी भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करण्यात व्यस्त आहेत.
 
 
 
Modi at the center of New York elections
४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या महापौरपदाच्या निवडणुकीत ममदानी डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांच्याविरुद्ध रिपब्लिकन पक्षाकडून कर्टिस स्लिवा मैदानात उतरले असून माजी गव्हर्नर अँड्र्यू कुओमो हे स्वतंत्र उमेदवार म्हणून स्पर्धा करत आहेत. सध्या एरिक अॅडम्स हे न्यू यॉर्कचे महापौर असून ते डेमोक्रॅटिक पक्षाचेच आहेत.
 
जोहराम ममदानी यांचे हे पहिलेच वादग्रस्त वक्तव्य नाही. यापूर्वीही त्यांनी भारतातील निवडणुकांच्या काळात पंतप्रधान मोदी आणि भारतीय धोरणांवर तीव्र भाष्य केले होते. त्यानंतर भारतीय-अमेरिकन समुदायाने त्यांच्या विधानांचा तीव्र विरोध दर्शवला होता. अनेक संघटनांनी त्यांच्या वक्तव्यांना विभाजनकारी”असे संबोधून त्यांच्या उमेदवारीलाही विरोध नोंदवला होता. दरम्यान, या नव्या विधानामुळे पुन्हा एकदा भारतीय-अमेरिकन समाजात चर्चा रंगली आहे. काही जण ममदानींच्या टीकेला राजकीय डावपेच मानत आहेत, तर काही जण याला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न म्हणत आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने मात्र या वादावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.