नागपूर,
Nitin Gadkari : लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेचे मूल्य जपत ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक एस.एन. विनोद यांनी संपादकीय लेखनात रोखठोक विचार मांडले आहे. पत्रकारितेसाठी संपूर्ण जीवन समर्पित करणार्या एस.एन.विनोद यांनी नागपुरात हिंदी पत्रकारितेचा आधारस्तंभ मजबूत करण्यात मोठे योगदान दिले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार क्लब ऑफ नागपूरच्या वतीने प्रेस क्लब येथे एस.एन. विनोद यांच्या वाढदिवसानिमित्त स्मरणिकेच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक एस.एन. विनोद यांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार व स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे, वनराई फाउंडेशनचे विश्वस्त गिरीश गांधी, प्रेस क्लबचे प्रदीप मैत्र, जोसेफ राव आदी उपस्थित राहतील.
पत्रकारितेच्या विकासात अद्वितीय योगदान
गडकरी आपल्या भाषणात पुढे म्हणाले, पत्रकारितेतील आपले विचार स्वातंत्र्य कायम राखत एस.एन. विनोद यांनी हिंदी पत्रकारिता करीत एक आदर्श निर्माण केला. पत्रकार म्हणून त्यांनी आपली प्रतिमा जपत पत्रकारितेचे धर्म पालन केले आहे. जीवनात अनेक चढउतार बघत असताना वैचारिक ते ठाम राहिले. हिंदी पत्रकारितेच्या विकासात अद्वितीय योगदान देणारे एसएन विनोद यांनी विदर्भातील मराठी आणि हिंदी पत्रकारितेत अनेकांना पत्रकार म्हणून संधी दिली. याप्रसंगी मुख्य माहिती आयुक्त, राहुल पांडे, वनराई फाउंडेशनचे विश्वस्त गिरीश गांधी, प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र आदींनी गौरवउद्गार काढले.