तभा वृत्तसेवा
मारेगाव,
panchayat-garbage : मारेगाव शहरातील घनकचरा मारेगाव-मार्डी रस्त्याबाजूलाच टाकल्या जात आहे. या मार्गावरून मार्गक्रमण करणाèया वाटसरूंना दुर्गंधीमुळे नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. तरी मारेगाव-मार्डी रस्त्यावरील कचरा डेपो हटवण्यात यावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
मारेगाव शहरातील घनकचèयाची विल्हेवाट लावण्यासाठी कंत्राट दिले जातात. शहरातील कचरा गोळा करून तो शहरापासून 1 किमी अंतरावरच मारेगाव-मार्डी रस्त्याच्या कडेलाच टाकला जात असल्याने या कचèयाच्या ढिगाèयाची दुर्गंधी पसरते. रस्त्यावरून येणाèया जाणाèयांना येथून नाक दाबूनच जावे लागते. येथे डुकरांचा वावर या रस्त्यावर वाढला आहे. तरी हा कचरा डेपो हटविण्यात यावा, अशी मागणी नागरिक करीत आहे.