सांगली,
Aghori puja sangali सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील वासुंबे गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. गावाजवळील स्मशानभूमीत काल संध्याकाळी अघोरी पूजेचे विचित्र दृश्य पाहायला मिळाले, ज्यामुळे गावकऱ्यांमध्ये भयभीत वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेनुसार, स्मशानभूमीत चार आयडेंटिटी साइजच्या अज्ञात व्यक्तींचे फोटो, लिंबू-मिरच्या, काळी बाहुली, कवाळ आणि गुलाल लावलेली पूजेची मांडणी करण्यात आली होती. हे दृश्य पाहताच गावकऱ्यांचे पायाखालचे जमीन हादरली. मात्र, या फोटो कोणत्या व्यक्तींचे आहेत हे अद्याप निश्चित झालेले नाही.गावकऱ्यांनी या संदर्भात तासगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत. अघोरी पूजेचा नेमका हेतू काय, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.या विचित्र घटनेमुळे वासुंबे गावात तसेच तासगाव तालुक्यात भय आणि संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. पोलीस अधिक तपास करून या रहस्यमय पूजेचा हेतू स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत.