रुग्णांना सुविधा गरजुंती योजनेचा लाभ घ्यावा: केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

    दिनांक :01-Nov-2025
Total Views |
बुलडाणा, 
Prataprao Jadhav : प्रत्येकाला सहज ,सुलभ,आणि माफक अशी आरोग्य सेवा मिळावी या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत विविध आजारांवर मोफत उपचार केल्या जातात आता नव्याने ९ दुर्धर आजारांचा समावेश राखीव निधीत समाविष्ट केल्यामुळे प्रत्यारोपण आणि रिप्लेसमेंट सारखी सुविधाही सर्वसामान्य जनतेला मिळणार आहे .तेव्हा शासनाच्या या योजनेचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालतून करण्यात आले आहे .
 
 
KL
 
सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू समजून जनतेला सहज सुलभ आणि माफक दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहे यामध्ये एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना - महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत विविध आजारांवर मोफत उपचार करण्यात येतात . या योजनेत अंतर्गत प्रति वर्ष ,प्रती कुटुंब पाच लाखांपर्यंत आरोग्य विषयक खर्च सरकारतर्फे मोफत करण्यात येतो . आता राखीव निधीत समाविष्ट असणारे ९ दुर्धर आजार आणि उच्चतम मर्यादा यामध्ये सरकारने वाढ केली आहे त्यानुसार यकृत प्रत्यारोपण साठी २२ लाख रुपये, फुफ्फुस प्रत्यारोपण साठी २० लाख रुपये , हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपणसाठी २० लाख रुपये , अस्थिमज्जा प्रत्यारोपण (अनरिलेटेड) साठी १७ लाख रुपये ,अस्थिमज्जा प्रत्यारोपण ( हॅप्लो) साठी १७ लाख रुपये , हृदय प्रत्यारोपण साठी १५ लाख रुपये , ट्रान्स कॅथेटर एऑटिक व्हॉल्च इम्प्लांटेशन साठी १० लाख रुपये , ट्रान्स कॅथेटर एऑटिक व्हॉल्च रिप्लेसंमेन्ट साठी १० लाख रुपये आणि अस्थिमज्जा प्रत्यारोपण (अलोजे निक) साठी ९ लाख ५० हजार रुपये खर्च आता शासकीय रुग्णालयांना मिळणार्‍या निधी पैकी २० टक्के निधीतून या नऊ दुर्धर आजारांसाठी राखीव ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाच्यावतीने घेण्यात आला आहे .त्यामुळे अंगीकृत सगळ्या शासकीय रुग्णालये , आरोग्य संस्था तसेच अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करिता मान्यता प्राप्त असलेल्या सर्व रुग्णालये , आरोग्य संस्था आणि खाजगी रुग्णालयाहीतही उपचार करण्यात येणार आहे . या योजनेचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालय आणि भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.