मोबाईलच्या युगात दिवाळी अंकात लेखक कवींचे मोठे योगदान : मुख्याधिकारी पांडे

*दिवाळी अंकाचे प्रकाशन

    दिनांक :01-Nov-2025
Total Views |
बुलढाणा, 
Publication of Diwali Issue : दिवाळीच्या फराळा इतकेच मेंदूला खाद्य पुरवण्याचे काम दिवाळी अंक करत असतात. समृद्ध लेखक आणि कवी घडवण्यात दिवाळी अंकांचे मोठे योगदान आहे. वाचन संस्कृती जपणं आजच्या काळात आवश्यक झाले आहे. हीच वाचन संस्कृती सातत्याने जोपासण्याचं काम गर्दे वाचनालय करीत आहे. असे मत दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी नपा मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी व्यक्त केले.
 
 
KL
 
गर्दे वाचनालयात दिवाळी २०२५ च्या दिवाळी अंकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गर्दै वाचनालयाचे अध्यक्ष गोकुळ शर्मा होते. प्रमुख पाहुणे शिक्षणाधिकारी उमेश जैन, मंदार बाहेकर, उदय देशपांडे, विनायक वरणगावकर व्यासपीठावर उपस्थित होते.
 
 
या प्रसंगी बोलतांना गणेश पांडे म्हणाले की सध्याच्या काळात सगळ्यांच्या हाती मोबाईल आहे. मोबाईल पासून दूर जाऊन सगळ्यांनी वाचन करणे हे गरजेचे आहे. त्यातूनच समृद्ध वाचन संस्कृतीची जपवणूक होऊ शकते. बुलढाणा शहराच्या सांस्कृतिक इतिहासात गर्दै वा-चनालयाचे योगदान खूप मोठे असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन करून मान्यवरांनी दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाचे उदघाटन केले. या प्रदर्शनात १५० पेक्षा जास्त दिवाळी अंक ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन अ‍ॅड. अमोल बल्लाळ यांनी केले.
 
 
या कार्यक्रमासाठी चालक डॉ. प्रविण पिंपरकर तथा कर्नल सुहास जतकर, कादंबरीकार सदानंद देशमुख, प्रा. विजय जोशी, प्रा. रामदास शिंगणे, प्रविण महाजन यांचेसह आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल नेमीनाथ सातपुते, श्रीकांत कुलकर्णी, सचिन बल्लाळ, हिंगे, पालकर यांचे सह ग्रंथालयातील सहकार्याने पुढाकार घेतला होता.