पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ यांचे दर्यापुरात गुरूवारी व्याख्यान

    दिनांक :01-Nov-2025
Total Views |
दर्यापूर, 
Pushpendra Kulshrestha : प्रसिद्ध व्याख्याते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ हे येत्या गुरूवारी, ६ नोव्हेंबरला दर्यापूरला येणार आहेत. येथील वा. का. धर्माधिकारी शासकीय कन्या शाळेच्या पटांगणावर सकल हिंदू समाज मंच त्यांच्या व्याख्यानाकरिता जय्यत तयारी करीत आहे. गेल्या अनेक दिवसापासून पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या व्याख्यानासाठी आयोजक प्रयत्नरत होते. अखेर ६ नोव्हेंबरला हे व्याख्यान होणार आहे.
 

K  
 
प्रखर राष्ट्रवादाचा शंखनाद म्हणून ओळख असलेल्या ज्येष्ठ पत्रकार व प्रभावी वक्ते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे व्याख्यान संध्याकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आलेले आहे. आपल्या प्रखर वणीने प्रसिद्ध असलेले प्रा. कुलश्रेष्ठ देशाचा जाज्वल्य इतिहास प्रभावीपणे मांडतात. देश, देव आणि धर्म कार्यावरील व्याख्यानासाठी प्रसिद्ध असलेले पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांची भारतभर तथा विदेशात व्याख्याने होत असतात. दर्यापूर शहरात पहिल्यांदाच होत असलेल्या या व्याख्यानाचा लाभ दर्यापूरकरांनी घ्यावा, असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या आयोजित बैठकी मध्ये करण्यात आले आहे.