अवकाळी पावसाने रब्बी हंगाम लांबणार

पुसद तालुक्यात सुमारे 17 हजार हेक्टर रब्बीक्षेत्र

    दिनांक :01-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
पुसद,
rabi-season : ऑक्टोबर महिना संपत आला असला तरी पाऊस काही थांबायचे नाव घेत नाही. मात्र अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांच्या पेरणीला विलंब होणार असून रबी हंगाम लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत आहेत. सततच्या पावसाने जमिनी वाफशावर येण्यास वेळ लागत असून मशागतीला वेळ लागत आहे. पुसद तालुक्यात दरवर्षी सुमारे 17 हजार 238 हेक्टरवर रब्बी हंगामातील पिकांची पेरणी होते. यात पुस प्रकल्पाच्या पाण्यावर 9 हजार 524 हेक्टर, जिल्हा परिषद सिंचन तलाव 1 हजार 127 हेक्टर, विहीर, नदी, नाले व इतर स्रोतांवर 5 हजार 65 हेक्टर ओलित केल्या जाते.
 

y1Nov-Perani 
 
तालुक्यात सुमारे 8 हजार ते 9 हजार हेक्टरवर हरभरा पेरणी होण्याची शक्यता आहे. अंदाजे 3 हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी होण्याचा अंदाज आहे. तर रब्बी ज्वारी 1 हजार हेक्टर, नवीन ऊस लागवड दीड ते दोन हजार हेक्टरवर अपेक्षित असून भाजीपाला व चारावर्गीय पिकाची लागवड उर्वरित क्षेत्रावर अपेक्षित आहे.
 
 
तालुक्यात 18 हजार 10 हेक्टर जमीन भारी पोत असलेली, 23 हजार 209 हेक्टर मध्यम पोत व 33 हजार 831 हेक्टर जमीन हलका पोत असलेली आहे. लांबलेल्या पावसामुळे हरभरा पेरणीला अद्यापही वेग आला नसून थंडीत चांगले येणाèया गहू पेरणीलाही अजून म्हणावी तशी सुरवात झालेली नाही.
 
 
सोयाबीन काढल्यावर रिकाम्या झालेल्या शेतात सद्यस्थितीत मशागत आटोपून सèया पाडून नवीन ऊस लागवडीची धामधूम दिसून येत आहे. असे असले तरी पाऊस लवकर न उघडल्यास रब्बी हंगाम अजून लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे.
बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नये: अक्षय गोसावी
 
सततच्या पावसाने जमिनीत बुरशी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे शेतकèयांनी हरभरा, गहू व रब्बीतील इतर पीक पेरणी करतेवेळी बीजप्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करु नये. बुरशी व मररोग टाळण्यासाठी प्रतीबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करावा. यासाठी कृषी विभागाचे मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी यांनी शेतकèयांना केले आहे. तसेच रब्बी हंगामात पेरणी होणाèया सर्व पिकांसाठी तालुक्यात मिश्र खत, युरिया इत्यादी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याचे नियोजन केल्याचे तालुका कृषी अधिकारी विजय मुकाडे यांनी सांगितले.