सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी

आयुष्मान कार्ड वाटप कार्यक्रम उत्साहात

    दिनांक :01-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा आर्णी,
Sardar Vallabhbhai Patel Jayanti, भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर 2025 रोजी जवळा येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ‘रन फॉर युनिटी’ या जनजागृती रॅलीसोबतच प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आयुष्मान भारत अंतर्गत लाभार्थ्यांना आयुष्मान कार्डचे वाटपही करण्यात आले.
 


Sardar Vallabhbhai Patel Jayanti,  
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रिया तोडसाम यांनी भूषविले, तर प्रमुख अतिथी म्हणून राजेश आडे (कामगार उपायुक्त, मुंबई), किसन राठोड (जिल्हा सचिव भाजपा), आरिफ शेख, बाबारावजी खोडणकर, नंदू देशमुख, गणेश एकंडवार (जिल्हाध्यक्ष व्यापारी आघाडी सोशल मीडिया), आशिष राठोड, खेमसिंग राठोड, अनिल चौधरी, अमित रामटेके व गोपाल कोटमकर यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आयोजन नीता राजेश आडे यांनी, तर सूत्रसंचालन वट्टमवार यांनी केले.
रन फॉर युनिटी रॅलीला स्थानिक नागरिक, युवक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रॅलीतून राष्ट्रीय एकात्मता, ऐक्य आणि बंधुत्वाचा संदेश देण्यात आला. याचबरोबर आयुष्मान भारत योजने अंतर्गत नागरिकांना आरोग्य विमा संरक्षणाचे लाभ मिळावेत यासाठी कार्ड वितरण करण्यात आले.
शेवटी अतिथींनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचे स्मरण करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. जवळा व परिसरातील नागरिक, कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयंती उत्सव यशस्वी केला.