सत्याचा मोर्चा लोकांची फसवणुक करणारा

... म्हणून भाजपाकडून “मूक मोर्चा”

    दिनांक :01-Nov-2025
Total Views |
मुंबई :
Ravindra Chavan निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि मनसेच्या विरोधकांचा “सत्याचा मोर्चा” मुंबईत पार पडला. या मोर्चामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते बाळसाहेब थोरात यांनी उपस्थित राहून भाजप आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला.
 

Ravindra Chavan  
या विरोधकांच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी भाजपाने “मूक मोर्चा” आयोजित केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यावेळी आक्रमक भूमिका घेत विरोधकांवर टीका केली आणि जनतेला कट हाणून पाडण्याचे आवाहन केले. चव्हाण यांनी सांगितले की, “महाविकास आघाडीच्या घटकांनी मुंबईमध्ये मोर्चा काढण्याचा निर्धार एक महिन्याआधीच केला होता. हा मोर्चा जनतेची दिशा भूल करणारा आहे. विरोधकांचा मोर्चा आहे असे समजू नका. या कटाचा डाव बूथ कार्यकर्त्यांनी उधळून लावावा आणि नागरिकांना घरोघरी स्पष्ट सांगावे.”
 
 
चव्हाण यांनी महाविकास Ravindra Chavan आघाडीवर निर्णयक्षमतेचा अभाव असल्याचा आरोप करत म्हटले की, “अडीच वर्षात हे कधीच एकमताने निर्णय घेऊ शकले नाहीत. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉमन अजेंड्यावर काम करू शकले नाहीत. देशभरात निवडणुकीचे वातावरण आहे, आणि बिहार निवडणुकीत वेगळे परिणाम दिसू नयेत म्हणून कॉँग्रेसने अंग काढले. यांची भूमिका स्पष्ट नाही, फक्त बिघाडी आहे.”रवींद्र चव्हाण यांनी जनतेला उद्देशून म्हटले, “लोकशाही मार्गाने महाराष्ट्राला न्याय मिळवून द्यावा. स्वप्नातला महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या प्रगत दिसायला हवा. अनेक एनजीओ विरोधकांना खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यासाठी जनतेला जागरूक होऊन हा कट हाणून पाडावा.”मुंबईतील सत्याचा मोर्चा आणि भाजपकडून मूक मोर्चा आयोजित करून राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले असून, निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापर्यंत या राजकीय गतीविषयक चर्चा सुरू राहण्याची शक्यता आहे.