मुंबई :
Satyacha Morcha राज्यातील विरोधकांनी आयोजित केलेल्या “सत्याच्या मोर्चा”त शनिवारी मुंबईत प्रचंड गर्दी उसळली. राज्यातील विविध भागांतून हजारो कार्यकर्ते आणि समर्थक या मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थिती लाभली.
मोर्चाच्या समारोप Satyacha Morcha सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या एकतेचा संदेश देत मोठे राजकीय संकेत दिले. “आम्ही दोघं भाऊ एकत्र आलो आहोत, तुमच्यासाठी आलो आहोत. मराठी माणसासाठी, हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी आलो आहोत,” असे ते म्हणाले. ठाकरे यांनी जनतेला आवाहन करताना सांगितले की, “आम्ही पुढे जात असताना तुम्ही साथ दिली पाहिजे. साथ देण्याची धमक असेल तर हाताची मूठ वळवून दाखवा. हा फोटो मतचोराच्या बादशाहकडे पाठवा. मतचोरी केली तर ही मूठ त्यांच्या टाळक्यात हाणल्याशिवाय राहणार नाही.”
सभेदरम्यान Satyacha Morcha ठाकरे यांनी निवडणूक आयोगावरही निशाणा साधला. “चोर दिसेल त्याला तिथेच फटकवा, पण लोकशाही मार्गाने फटकवा. आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही. अॅनाकोंडा बसला आहे, पण आम्ही कायदेशीर मार्गाने लढणार आहोत,” असे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, “निवडणुका जवळ आल्या की या सत्ताधाऱ्यांची दडपशाही वाढते. आम्ही सर्व पुरावे जमा करून न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहोत. न्यायालयातून न्याय मिळतो का हे पाहू, अन्यथा जनतेचं न्यायालय निर्णय घेईल.”राज ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे मोर्चात वेगळाच उत्साह दिसून आला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एका मंचावरच्या उपस्थितीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.“सत्याचा मोर्चा” हा केवळ विरोधकांचा निदर्शनेचा कार्यक्रम नसून आगामी निवडणुकांसाठी एकता आणि संघर्षाची हाक असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. ठाकरे-पवार-थोरात आणि राज ठाकरे यांचा एकत्रित संदेश असा होता – महाराष्ट्रात मतचोरी आणि अन्यायाविरुद्ध आता जनतेचाच आवाज निर्णायक ठरणार आहे.