सेलू,
selu-nagar-panchayat : पिण्यासाठी पाणी देणे हे सर्वच जाती धर्मांमध्ये पुण्याचे काम समजले जाते. उन्हाळ्यात पाण्याचा दुष्काळ पडल्यावरही गावगाड्यात अजूनही मोफत पाणी दिले जाते. आग लागल्यावरही ती विझवण्यासाठी मिळेल त्या साहित्याने पाण्याचा मारा केला जातो. सेलू तालुयातील वडगाव खुर्द येथे गेल्या आठवड्यात एका गरिबाच्या घराला आग लागली. आगीत घर बेचिराख झाले. आग लागण्याच्या भीतीतून घर मालक बाहेर पडण्यापूर्वीच सेलू नगर पंचायतने आग विझवण्यासाठी पाठलेल्या अग्निक्षमण दलाच्या बंबाचे ४ हजार रुपये शुल मागण्यासाठी नोटीस बजावल्याने माणुसकी मेली काय असा प्रश्न आता उपस्थित केल्या जात आहे.

येथील नगरपंचायत अनागोंदी कारभारामुळे चांगलीच चर्चेत आहे. अशातच आता येथील मुख्याधिकार्यांनी आणखी एक पराक्रम केला. तालुयातील वडगाव खुर्द येथील झामरे आणि खोंडे यांचे घर आणि गोठ्याला २४ ऑटोबरच्या मध्यरात्री आग लागली. यावेळी घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्याने संसारोपयोगी साहित्यासह शेती साहित्याची अक्षरशः राखरांगोळी झाली. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. झामरे परिवाराचा संसार उघड्यावर आला. सर्वत्र हळहळ व्यत करण्यात आल्याने या परिवाराला सर्व स्तरावर मदतीचा हात पुढे करण्यात आला. शासन स्तरावर त्यांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मदत मिळण्याची अपेक्षा आहे. याकरिता कागदपत्रांची जुळवाजूळव करताना त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
सदर आगीनंतर घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्याने त्यांना आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाची मदत घेतल्याचे प्रमाणपत्र हवे आहे. आग आटोयात आल्यानंतर सेलू येथील अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. ते सुद्धा मोटरसायकलवाले. त्याकरिता झामरे परिवाराला त्याच्या शुल्कापोटी सेलू नगरपंचायतने ४ हजार रुपयांची मागणी केली. झामरे परिवार आधीच आगीत राखरांगोळी झाल्याने आर्थिक संकटात सापडला आहे. समाजातील दातृत्वाने त्यांना मदतीचा आधार देत सांत्वना करण्याचा प्रयत्न केला. परंतु, नगरपंचायत प्रशासनाला मात्र काही घाम फुटला नाही. येथील निगरगट्ट प्रशासनाला त्या पीडित परिवाराच्या आर्थिक नुकसानीचे काहीच घेणे देणे नाही.
यात लेशदायक बाब म्हणजे त्या पिडीत परिवाराने अग्निशमन शुल्क भरण्यास असमर्थता दर्शविताच नगरपंचायतच्या मुख्याधिकारी अग्रवाल यांनी वडगाव ग्रामपंचायतला काल गुरुवार ३० रोजी पत्र देत सदर अग्निशमन शुल्क आपल्या मार्फत वसुल करून अदा करण्याचे फर्मान बजावले. झामरे यांच्या घरी आग लागली. आगीत संपूर्ण घराची राख रांगोळी झाली. अंगावर घालायला कपडे राहिले नाहीत. जीवनोपयोगी सर्व साहित्य जळलो. पीडीत झामरे कुटुंबाला आपत्ती व्यस्थापन विभागाच्या मिळणार्या मदतीत अडसर निर्माण करून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नगरपंचायतच्या माणुसकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.