‘वॉक फॉर युनिटी’ मधून ’एक भारत श्रेष्ठ भारत’चा संदेश

राष्ट्रीय छात्र सेनेचा उत्स्फूर्त सहभाग

    दिनांक :01-Nov-2025
Total Views |
वाशीम,
walk for unity लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त वाशीम जिल्हा पोलिस दलातर्फे ‘एकता, सामर्थ्य आणि राष्ट्रीय अभिमानाचा संदेश’ देत वाशीम येथे वॉक फॉर युनिटी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पडला.
 

walk for unity 
 
 
 
‘लोहपुरुष’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या सरदार पटेल यांच्या अदम्य नेतृत्वातून प्रेरणा घेत या उपक्रमात पोलिस अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, स्वयंसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण वातावरण एकतेचा जयघोष, राष्ट्रीय ध्वजाचा मान आणि देशभक्तीच्या भावनेने भारावून गेले होते. या माध्यमातून प्रत्येकाच्या मनात एक भारत, श्रेष्ठ भारत या विचाराची नवी ज्योत प्रज्वलित झाली. या ‘वॉक फॉर युनिटी’ मध्ये राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सचा सहभाग लक्षणीय होता.walk for unity यामध्ये श्री बाकलीवाल विद्यालयाच्या ६५ विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. त्यांच्या या उत्स्फूर्त सहभागाबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलिस अधीक्षक लता फड आणि सहाय्यक पोलिस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांनी एनसीसी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेंद्रकुमार बाकलीवाल, मुख्याध्यापक बबन बिल्लारी, उपमुख्याध्यापक दंभीवाल, एनसीसी अधिकारी अमोल काळे व सर्व शिक्षकवृंद यांनी कौतूक केले.