तभा वृत्तसेवा
उमरखेड,
umarkhed-kisan-wankhede : प्रगती करत असताना पृथ्वीचा समतोल बदलत असून त्यामुळे रोगराईचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य कर्मचाèयांनी परिवार व कुटुंब असल्याप्रमाणे शासकीय रुग्णालयाची देखभाल करावी तसेच आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे रुग्णांना सेवा द्यावी, असे प्रतिपादन आमदार किसन वानखेडे यांनी केले.
उमरखेड उपजिल्हा रुग्णालयमध्ये एचएलएल लाईफ केअर कंपनीद्वारा संचालित सुसज्ज डायलिसिस सेंटर लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. शनिवार, 1 नोव्हेंबर रोजी आ. किसन वानखेडे, भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, शिवसेना संपर्कप्रमुख चितांग कदम, तालुकाप्रमुख प्रवीण मिराशे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश मांडण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संभाजी डोंगे आणि शिवसेना व भाजपा पदाधिकाèयांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
यावेळी बोलताना आ. किसन वानखेडे यांनी, पिकांवर विषारी औषधाच्या अती प्रभावाने ग्रामीण भागात रोगराई उत्पन्न होत असून ती बदलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तर नितीन भुतडा यांनी डायलिसिसची ग्रामीण भागातील जनतेला नितांत गरज आहे. त्यांनी रुग्णांना प्राधान्याने सेवा देण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकाèयांना केले.
यावेळी मंचावर संतोष जाधव, अॅड. संजय जाधव, कैलास कदम, रवी रुडे, अनिल नरवाडे, डॉ. किशोर राठोड, डॉ. राजेश रावते, डॉ. नितीन अॅक्यमवार उपस्थित होते. संचालन आयसीटीसी समुपदेशक वैशाली धोंगडे यांनी केले. तर प्रस्ताविक डायलिसिस समन्वयक ईशांत गरेवार यांनी केले.