नागभीड,
bear walks with cubs : वाढोणा व सावरगाव परिसरात अस्वलीचे दोन पिल्ल्लांसह दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
शुक्रवारी रात्रीच्या सुमारास वाढोणा गावात एकटी अस्वल गल्लोगल्ली फिरताना दिसली. याबद्दल तात्काळ स्वाब फाउंडेशनला माहिती देण्यात आली. तिच्या शोधासाठी स्वाब फाउंडेशनची चमू व वनविभागाचे अधिकारी गावात दाखल झाले. फटाके फोडून अस्वलीला जंगलाच्या दिशेने हुसकावून लावण्यात आले. त्यानंतर परिसरामध्ये रात्रभर गस्त करण्यात आली. दरम्यान, शनिवारी सायंकाळी 4.30 वाजताच्या सुमारास तीच अस्वल दोन पिल्लांसह सावरगाव परिसरातील शेतशिवारात फिरताना दिसली. अस्वलीचे दर्शन होताच नागरिकांनी आरडाओरड करून तिचा पाठलाग केला. ही चित्रफीत समाजमाध्यामावर व्हायरल होताच असे कृत्य धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अस्वलीला हाकलण्याचा किंवा पाठलाग करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन वनविभाग व स्वाब चमूच्या वतीने करण्यात आले आहे.