वर्धा,
wardha-death-of-brother-and-sister : वृद्धापकाळाने बहिणीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच मोठ्या भावाने बहिणीचे घर गाठले. बहिणीला अखेरचा निरोप देऊन भाऊ आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाले असता त्यांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सायंकाळी भावाचेही निधन झाले. एकाच परिवारावर एकाच दिवशी दुप्पट दु:ख कोसळले.
लहानपणापासूनच बहीण-भावाचं घट्ट असलेलं नातं आयुष्याच्या शेवटपर्यंत राहिल्याचा अनुभव वर्धेकरांसह आप्तस्वकीयांना आला. शांता मनोहर ठाकरे (८४) रा. साईनगर वर्धा यांचे २८ ऑटोबरला पहाटे ५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. याची माहिती शांता यांचे ज्येष्ठ बंधू अंबादासपंत राऊत (८८) रा. नागपूर यांना दिली. त्यामुळे अंबादासपंत कुटुंबीयांसह बहिणीच्या अंत्यदर्शनासाठी वर्ध्यात पोहोचले. बहिणीवर अन्त्यसंस्कार करण्यात आले. सायंकाळच्या सुमारास अंबादासपंतांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी बहीण-भावाने अखेरचा श्वास घेतल्यामुळे ठाकरे आणि राऊत परिवारावर शोककळा पसरली.
वर्ध्यातील प्रा. नितीन ठाकरे यांच्या मातोश्री शांता ठाकरे यांच्या पार्थिवावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार आटोपल्यावर त्यांचे अंबादासपंत लहान बहीण गेल्याचे दुःख व्यत करीत होते. अशातच त्यांचीही अचानक प्रकृती खालावली. घरच्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. पण, डॉटरांना यश आले नाही.