शेतकरी आत्महत्या म्हणजे सामाजिक संवेदनेचे मरण

-परिसंवादातील चर्चेत मान्यवरांचा सूर -69 वे विदर्भ साहित्य संमेलन

    दिनांक :01-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
69th-vidarbha-literary-conference : शेतकèयांना निश्चित उत्पन्नाचा स्रोत नसल्याने कोेंडी व निराशेच्या गर्तेत जाऊन शेतकरी आत्महत्या करतात. शेतकèयांच्या आत्महत्या हा आपल्या सामाजिक, नैतिक भावनांचा पराभव आहे. साहित्यिकांनी या प्रश्नांचा मूलगामी वेध घ्यावा, असा सूर साहित्य संमेलनातील परिसंवादात उमटला.
 
 
y1Nov-Sahitya-Logo
 
यवतमाळ येथे आयोजित राजानंद गडपायले साहित्यनगरी, उबुंटू इंग्लिश स्कूल जांब येथे आयोजित 69 व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी, शनिवार, 1 नोव्हेंबरला दुसèया सत्रात ‘शेतीसंकट : अस्मानी की धोरणात्मक अपयश आणि साहित्यिकांची भूमिका’ या विषयावर परिसंवादाचे पार पडला.
 
 
या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार, तरुण भारतचे मुख्य संपादक शैलेेश पांडे होते. या परिसंवादात पत्रकार व संपादक प्रमोद काळबांडे, अविनाश दुधे व नूतन माळवी यांचा सहभाग होता. या सत्राचे संचालन प्रा. संजय निंबेकर यांनी केले. परिसंवादाच्या प्रारंभी प्रमोद काळबांडे यांनी, शेतीवरील संकट प्राचीन काळापासून आहे. सध्याची स्थिती लक्षात घेता शासनाने स्वामिनाथन आयोगाची स्थापना करण्यात आली व या आयोगाचा प्रदीर्घ अहवाल शासनाला सादर झाला. त्यात 200 शिफारशी करण्यात आल्या.
 
 
शासनाने त्यापैकी अनेक शिफारशी मान्य करून त्यांची अंमलबजावणी केली आहे. या विषयात आस्मानी संकट तर आहेच, पण उत्पादनखर्च शेतकèयांना न मिळणे, हमीभाव न मिळणे, धोरणाच्या पातळीवर शासनाला आलेले अपयश आदी कारणे आहेत. यात वृत्तपत्रांनी आपली भूमिका मांडली. पण अजूनही पत्रकार व साहित्यिकांचा दृष्टीकोन बदलण्याची गरज असल्याचे सांगितले.
 
 
त्याचप्रमाणे अविनाश दुधे म्हणाले, मागील दोन महायुद्धात जेवढी माणसं मारली गेली नाही, तेवढ्या आत्महत्या आपल्याकडे झाल्या. पूर्वी आत्महत्येचे आकडे येत होते, पण आता तेही येत नाहीत. आजवर अनेकदा कर्जमाफी झाली, सातबारा कोरा केला गेला पण आत्महत्या थांबत नाहीत. मुळात आत्महत्या का थांबत नाहीत हा खरा प्रश्न आहे, सरकार या समस्येच्या मुळाशी जायला तयार नाही असे दिसते.
 
 
या विषयावर आपले मत व्यक्त करताना नूतन माळवी, विदर्भातील आत्महत्येच्या कारणांमध्ये विदर्भात अल्पभूधारक शेतकरी अधिक, शेतीची पारंपरिक स्थिती, आधुनिकीकरणाचा अभाव, हमीभाव न मिळणे, आपले नेमके उत्पादन काय हेच मुळात कळत नाही. दुसरीकडे देशातील नागरिकांच्या असंवेदनशीलतेमुळे शेतकरी एकाकी पडला व या सर्वांचा परिपाक म्हणून आत्महत्या होत असल्याचे म्हणाल्या.
 
 
अध्यक्षीय भाषणात शैलेश पांडे म्हणाले की, शेतकèयांनी पारंपरिक शेतीचक्र भेदायला हवे, लहरी निसर्गामुळे बळी जाण्यापासून काळजी घ्यायला हवी, आणि सरकारी व्यवस्थेने शेतकèयांच्या दैनेबद्दल सखोल चिंतन करावे, तसेच आयात-निर्यात धोरणात शेतकèयांनाही प्राधान्य मिळावे असे सांगितले.