लाखो रुपयांच्या गांजाची शेती करणारा पोलिसांच्या ताब्यात

    दिनांक :01-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
पुसद, 
cannabis-farming : पुसद ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील चिखली कॅम्प येथे एका शेतकèयाने आपल्या शेतात गांजाची लागवड केली आणि तो स्वतः या गांजाची रखवाली करीत असल्याची गुप्त माहिती पुसद उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी ग्रामीण पोलिस ठाणेदार व पोलिस आणि उपविभागीय पोलिस पथकाने संयुक्तरित्या धाड टाकली असता शेतात गांजाची झाडे लावल्याचे आढळून आले.
 
 
L
 
पोलिसांनी या प्रकरणी चिंतामण हरिभाऊ डाखोरे (65, चिखली कॅम्प) याला अटक केली असून, त्याच्या शेतातून एकूण 84 किलो 900 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या गांजाची किंमत 12 लाख 73 हजार 500 रुपये आहे. याबाबत पुसद उपविभागीय पोलिस अधिकाèयांच्या सूत्राने दिलेली माहिती अशी की, या शेतकèयाने स्वतःच्या शेतात मानवी मेंदुवर विपरित परिणाम करणाèया गांजाची लागवड केली होती आणि या गांजा पिकाची तो स्वतःच रखवाली करीत होता.
 
 
गुरुवार, 30 ऑक्टोबर रोजी पोलिस हवालदार सुनील मदने, शंकर टाळीकुठे, जुनेद सय्यद यांना ही माहिती मिळाली. ठाणेदार सुरेंद्र राऊत यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाने चिंतामण डाखोरे याच्या शेतावर संयुक्तरित्या छापा टाकला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, 1985 नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
 
 
ही कारवाई सहायक अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी हर्षवर्धन यांच्या मार्गदर्शनात पुसद ग्रामीण पोलिस ठाणेदार सुरेंद्र राऊत, राहुल देशमुख, शंकर टाळीकुटे, रवींद्र गावंडे, विनायक चव्हाण, सचिन बनकेवार, मो. ताज, संताष राठोड, शोएब शेख, व जुबेर सय्यद यांनी केली.