अल्लीपूर,
Allipur Rath Yatra, सद्गुरू आबाजी महाराज देवस्थान येथे १६ पर्यंत श्रीमद्भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कथाकार श्रद्धा वाडीले रा. नाचवेल जि. छत्रपती संभाजीनगर भागवत कथा करीत आहेत.
दररोज सकाळी ६ ते ७ काकड आरती, ९ ते ११.३० श्रीमद्भागवत कथा, दुपारी २ ते ५ भजन, सायंकाळी ७ ते ८ हरिपाठ, रात्री ८.३० ते ११.३० श्रीमद्भागवत कथा आयोजित आहे. रविवार १६ रोजी सकाळी ६ वाजता काकड आरती, ७ ते ८ होमहवन, दुपारी २ ते ५ गोपाल काल्याचे कीर्तन होईल. सायंकाळी ५ ते रात्री १० श्रींची पालखी मिरवणूक रथयात्रा दीपमाळीकडे आबाजी महाराज देवस्थान येथून निघेल. भाविक आपल्या हातांनी १२ बाय २२ फुटांचा (सागवान) राम-लक्ष्मण-सीता आरूढ असलेली ही रथ यात्रा पाहण्यासाठी भत मोठ्या संख्येने येतात. सोमवार १७ रोजी भवानी मंदिर येथे दुपारी २ वाजता गोपाल काल्याचे कीर्तन होईल. येथील यात्रा महोत्सवानिमित्त वर्धा व हिंगणघाट येथून विशेष यात्रा बस सोडण्यात येणार आहे.