हज यात्रेच्या नावाखाली २०.४२ लाखाने फसवणूक

    दिनांक :10-Nov-2025
Total Views |
मंगरुळनाथ,
hajj-pilgrimage हज यात्रेचे आमिष दाखवून तब्बल २० लाख ४२ हजार ८५१ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध मंगरुळनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ३ नोव्हेंबर २०२३ ते ११ जून २०२४ या कालावधीत घडली असून, ८ नोव्हेंबर रोजी रात्री पोलिस ठाण्यात नोंदविण्यात गुन्हा आला.
 
 
hajj-pilgrimage
 
तक्रारदार सैय्यद अब्दुल हमीद सैय्यद अब्दुल मजीद (वय ६०) रा.चेहलपुरा, मंगरुळनाथ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सैय्यद तन्वीर उल्लाह अजमत उल्लाह इनामदार आणि सैय्यद नईम इनामदार अजमत उल्लाह इनामदार (दोघे रा. बागवानपुरा, अकोट) या दोघांनी तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना हज यात्रेस पाठविण्याचे आमिष दाखवले. ३ नोव्हेंबर २०२३ ते ११ जून २०२४ या कालावधीत तुमची हज यात्रेची बुकिंग आणि सर्व व्यवस्था आम्ही करतो, असे सांगून त्यांनी तक्रारदाराकडून २० लाख ४२ हजार ८५१ रुपये स्वीकारले. मात्र, त्यानंतर ना पैसे परत केले, ना यात्रेची कोणतीही व्यवस्था केली. hajj-pilgrimage परिणामी, तक्रारदाराची मोठ्या रकमेची आर्थिक फसवणूक झाली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धावळे करीत आहेत.