पाकिस्तानात ५० वर्षांपूर्वीचा भीतीदायक काळ पुन्हा परतणार

आसिम मुनीरचा ‘साइलेंट तख्तापलट’

    दिनांक :10-Nov-2025
Total Views |
इस्लामाबाद,  
asim-munir पाकिस्तानमध्ये सध्या शांतपणे मोठे राजकीय बदल घडत आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर फील्ड मार्शल बनले. त्यानंतर त्यांची अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी वॉशिंग्टनमध्ये भेट झाली आणि त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध अचानक बदलले. पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या तुलनेत आसिम मुनीर यांना अधिक महत्त्व दिले जात असल्याने हे स्पष्ट झाले की त्यांचा प्रभाव आता फक्त लष्करापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर ते प्रत्यक्षात पाकिस्तानचे ‘रिअल रूलर’ झाले आहेत.

asim-munir 
 
आसिम मुनीर समोरून नव्हे तर पडद्यामागून सत्तेचा ताबा घेत आहेत. asim-munir पाकिस्तानमध्ये संविधानातच बदल करून त्यांना सर्वोच्च अधिकार देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या बदलाला अनेक राजकीय तज्ज्ञ ‘साइलेंट तख्तापलट’ असे म्हणत आहेत. या घटनादुरुस्तीअंतर्गत संविधानातील कलम २४३ मध्ये सुधारणा केली जाणार असून त्यानंतर संपूर्ण सत्ता आसिम मुनीर यांच्या हाती केंद्रीत होईल. ते थलसेना, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही दलांचे प्रमुख ठरतील. देशातील आण्विक शस्त्रांवरही त्यांचाच ताबा असेल आणि फील्ड मार्शलचा दर्जा संविधानात कायमस्वरूपी केला जाईल. वृत्तानुसार, या सुधारणा अमलात आल्यास पाकिस्तानमध्ये सैन्य प्रमुखच सर्वोच्च सेनाप्रमुख बनेल. सध्या असलेले जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे पद रद्द केले जाईल आणि त्याच्या सर्व अधिकार फील्ड मार्शलकडे म्हणजेच आसिम मुनीर यांच्याकडे दिले जातील. त्यामुळे संपूर्ण सत्तेची सूत्रे त्यांच्याच हातात येतील.
या घडामोडींनी पाकिस्तानमध्ये जनरल झिया-उल-हक यांच्या काळाची आठवण करून दिली आहे. asim-munir झिया-उल-हक यांनी तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांचे सत्ताचक्र उलथवले होते. आता परिस्थिती थोडी वेगळी असली तरी, आसिम मुनीर जिया-उल-हकप्रमाणे थेट तख्तापलट करणार नाहीत, तर घटनात्मक मार्गानेच सत्ता हातात घेतील, असे मानले जात आहे. त्याचबरोबर असा प्रस्तावही मांडण्यात आला आहे की, फील्ड मार्शल या पदावर असताना किंवा त्यानंतरही त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होऊ शकणार नाही. म्हणजेच त्यांना आजीवन विशेषाधिकार मिळतील. या सर्व घटनाक्रमामुळे पाकिस्तानमध्ये पुन्हा ५० वर्षांपूर्वीचा तोच भीतीदायक काळ परत येत असल्याची भावना निर्माण झाली आहे — जेव्हा लष्कराने सत्ता ताब्यात घेतली होती आणि देश कट्टरतेच्या जाळ्यात अडकला होता.