borgaon-eklavya-school नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या ५ व्या राज्यस्तरीय एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल क्रीडा स्पर्धेत गोंदिया जिल्ह्यातील देवरी आदिवासी विकास प्रकल्पातंर्गत येणार्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या घामाच्या थेंबांनी इतिहास लिहिला. अथक मेहनत, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर ५ क्लस्टरपैकी अनेक क्रीडा प्रकारांमध्ये ३१ सुवर्णपदक, ६६ रजतपदक व २० कांस्यपदक असे ११७ पदके पटकावून उपविजेता चॅम्पियन ट्रॉफी मिळवून जिल्ह्याचा आणि विदर्भाची मान उंचावली.
राज्यस्तरीय स्पर्धेत बोरगाव बाजार शाळेतील १८२ विद्यार्थी सहभागी झाले होते. तायक्वांदो, ज्युडो, बॉक्सिंग, कुस्ती, हॉकी, बास्केटबॉल, फुटबॉल, पोहणे, बॅडमिंटन, अँथलेटिक्स आणि धनुर्विद्या आदी क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करीत एकूण ११७ पदकांसह स्पर्धेचे उपविजेतापद पटकाविले. शाळेच्या दोन शारीरिक शिक्षण शिक्षकांसह नऊ एस्कॉर्ट शिक्षकांच्या पथकाने संपूर्ण स्पर्धेत विद्यार्थ्यांसोबत राहून मार्गदर्शन केले. borgaon-eklavya-school तसेच शाळेचे मुख्याध्यापक गणेशकुमार तोडकर स्वतः उपस्थित राहत स्पर्धादरम्यान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. एकलव्य स्कुल बोरगाव बाजारच्या प्रयत्नांमध्ये घडलेला हा विजय केवळ पदकांचा नव्हे तर संघर्ष, आत्मविश्वास आणि संघभावनेच्या विजयाचा उत्सव आहे. हे क्षण पालक आणि विद्यार्थ्यांसाठी अभिमानाचे पर्व ठरले आहे.