मंगळवारी रंगणार ‘बुच’ महाेत्सव!

- शताब्दी वर्षात दै. तरुण भारतचा अभिनव उपक्रम

    दिनांक :10-Nov-2025
Total Views |
नागपूर, 
akash-ganga-flower दै. ‘तरुण भारत’च्या शताब्दी महाेत्सवांतर्गत ‘पावले ही फुलांची’ हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. यांतर्गत मंगळवारी 11 नाेव्हेंबर राेजी ‘बुच’ फुलांचा महाेत्सव साजरा हाेणार आहे. काचिपुरा ते दीक्षाभूमी मार्गावर सकाळी 8 ते 8.45 दरम्यान विशेष कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे.
 
 
akash-ganga-flower
 
दिवाळी सरून कार्तिक मासातील गुलाबी थंडी हळूहळू सुरू झाली आहे. त्यासाेबत हिरव्याकंच अशा आकाशनिंबाच्या झाडाला ‘बुच’ फुलांचे गुच्छ लाेंबू लागले आहेत. आपल्या मंद सुगंधाने सर्वांचा जीव शांतवून ही फुले रात्रीपासून पहाटेपर्यंत रस्त्यावर पसरून प्रत्येकाचे स्वागत करीत आहेत. akash-ganga-flower मिलेंगटाेनिया हाॅर्टेन्सिस असे शास्त्रीय नाव असलेल्या या झाडाला इंडियन काॅर्क ट्री तसेच ट्री जास्मिन असेही म्हटले जाते. दै. तरुण भारत संगे येत्या मंगळवारी पावले ही ुलांची या उपक्रमात ‘बुच’फुलांचा उत्सव साजरा हाेत आहे.
उलगडणार बुच फुलांचे अंतरंग
या कार्यक्रमात आकाशगंगा, आकाशनिंब, आकाशजुई आदी नावांनी परिचित असलेल्या बुच झाडाची व फुलांची शास्त्रीय माहिती आणि पर्यावरणीयदृष्ट्या असलेले महत्त्व ऑरा कन्झर्वेशन पार्कचे संस्थापक अंबरीश घटाटे, निसर्गप्रेमी डाॅ. वृंदा जाेगळेकर आणि गार्डन क्लबच्या उपाध्यक्षा डाॅ. राजश्री बापट उपस्थितांना समजावून सांगणार आहेत. उपस्थितांच्या मनातील प्रश्न आणि शंकांचे समाधानही ही मान्यवर तज्ज्ञ मंडळी करतील.
कार्यक्रम कुठे आणि कधी?
काचीपुरा ते दीक्षाभूमी मार्गावरील डाॅ. आंबेडकर महाविद्यालयालगतच्या पदपथावर मंगळवार दि. 11 नाेव्हेंबर राेजी सकाळी 8 ते 8.45 या वेळेत सदर कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे. akash-ganga-flower बुचा फुलांच्या या उत्सवात नागरिकांनी अधिकाधिक संख्येने सहभागी हाेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.