गोंदियात शितलहर; सोमवारी 10.4 अंश सेल्सीअस तापमानाची नोंद
दिनांक :10-Nov-2025
Total Views |
गोंदिया,
cold-wave-in-gondia शनिवारपासून गोंदिया जिल्ह्याचा पारा सातत्याने घसरत चालला आहे. यामुळे जिल्ह्यात थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. आज सोमवार 10 नोव्हेंबर रोजी यंदाच्या मोसमातील सर्वात कमी 10.4 अंश सेल्सीअस तापमानाची नोंद करण्यात आली. गोंदियाचे आजचे तापमान विदर्भात सर्वात कमी नोंदले गेले.
दिवाळीनंतर गुलाबी थंडीची चाहूल लागते. मात्र यंदा तसे चित्र बघायला मिळाले नाही. दिवाळीनंतर परतीचा पाऊस आठवडाभर जिल्ह्यात ठाण मांडून होता. नोव्हेंबर महिन्याची सुरवातही ढगाळ वातावरण व पावसाने झाली. 7 तारखेनंतर ढगाळ वातावरण निवळे. शनिवारपासून जिल्ह्याचे तापमान सातत्याने घटत आहे. शनिवारी 14.8, रविवारी 11.5 व आज सोमवारी 10.4 अंश सेल्सीअस तापमान नोंदले गेले. जे विदर्भात सर्वात कमी आहे. cold-wave-in-gondia उत्तरेकडून थंड वारे वाहत असल्याने थंडीत अधिकची भर पडत आहे. नागरिकांना आता सकाळी व सायंकाळी घराबाहेर पडताना विचार करावा लागत आहे. वाढत्या थंडीमुळे पहाटे फिरणार्यांची संख्याही रोडावल्याचे चित्र आहे. हिवाळ्याचे हे दिवस आरोग्यदायी मानले जाते. दमा, अस्तमा रुग्ण व वृद्धांनी थंडीत खबरदारी घेणेही तितकेच महत्वाचे असते. आणखी काही दिवस जिल्ह्यातील तापमानाची घसरण कायम राहणार असल्याचे वेध शाळेच्या सुत्रांचे म्हणने आहे.