तिरुपती देवस्थानात मांसाहारावरून वाद!

दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई

    दिनांक :10-Nov-2025
Total Views |
तिरुपती,
Controversy at Tirupati temple तिरुमला तिरुपती देवस्थानात मांसाहार केल्याच्या आरोपावरून दोन कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले आहे. या दोघांवर देवस्थान प्रशासनाने तातडीची कारवाई करत निलंबनाची कार्यवाही केली असून त्यांच्याविरोधात पोलिस तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
 

balaji 
मिळालेल्या माहितीनुसार, रामास्वामी आणि सरसम्मा अशी या दोघा कर्मचाऱ्यांची नाव आहेत. दोघेही त्रयस्थ कंपनीमार्फत कंत्राटी पद्धतीने तिरुपती देवस्थानात काम करत होते. अलिपिरी परिसरात या दोघांनी मांसाहार केल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर मोठा वाद उभा राहिला. मंदिर परिसरात नॉनव्हेज खाण हा देवस्थानाच्या धार्मिक नियमांचा भंग मानला जातो.
 
 
 
या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर तिरुमला तिरुपती देवस्थानाने दोघांना तात्काळ कामावरून काढत मंदिर शिस्तीचे उल्लंघन केल्याबद्दल कठोर भूमिका घेतली. तसेच अलिपिरी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे तिरुपती तीर्थक्षेत्रात मोठी चर्चा रंगली असून, मंदिर प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की, मंदिर परिसरात मांसाहार करणं हे अत्यंत गंभीर गुन्हा मानला जाईल आणि अशा कृतींवर शून्य सहिष्णुतेची भूमिका कायम राहील.