कापसाची आधारभूत दराने खरेदी प्रक्रिया राबवावी : अ‍ॅड. कोठारी

    दिनांक :10-Nov-2025
Total Views |
हिंगणघाट, 
adv kothari हिंगणघाट बाजार समितीमध्ये २०२५-२६ या हंगामातील खाजगी व केंद्र शासनामार्फत आधारभुत दराने कापूस खरेदीचा शुभारंभ समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांचे हस्ते सोमवार १० रोजी समितीचे कापूस मार्केट यार्ड येथे पार पडला. याप्रसंगी प्रथम कापूस आणणार्‍या वाहनाचे अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी शेतकरी मारोती धस रा. वाघोली यांचा सत्कार केला. यावेळी माजी आमदार प्रा. राजू तिमांडे, उपसभापती हरीष वडतकर, सीसीआयचे ग्रेडर सुमित देशमुख, संचालक मधुसूदन हरणे, उत्तम भोयर, प्रफुल्ल बाडे, ओमप्रकाश डालीया, राजेश मंगेकर, डॉ. निर्मेश कोठारी, पंकज कोचर तसेच शेतकरी उपस्थित होते.
 
 

rathod 
 
कापूस मार्केट आवारात ५२३ वाहनांद्वारे कापसाची आवक झाली. त्यापैकी शेतकरी अनिल तिमांडे रा. उसेगाव ता. समुद्रपूर यांच्याद्वारा सीसीआयद्वारा उपलब्ध करून दिलेल्या कपास किसान अ‍ॅपवरील संपूर्ण प्रक्रियेची पूर्तता केल्यामुळे व त्यांचा कापूस चांगल्या प्रतीच्या निकषामध्ये येत असल्यामुळे त्यांचा कापसाला प्रती विंटल ७८६६.७० दराने खरेदी केला. उर्वरित वाहनातील कापूस शेतकर्‍यांनी खुल्या लिलावामध्ये खाजगी व्यापार्‍यांना विक्री केला. त्यामध्ये शेतकर्‍यांना खुल्या लिलावामध्ये जास्तीत जास्त ७०९१ तर कमीतकमी ६४०० रुपये प्रति क्विंटल दर देण्यात आले.
शेतकर्‍यांनी कापसाला खुल्या बाजारात किमान सरसकट ७ हजार प्रति क्विंटल दर खाजगी व्यापार्‍यांनी द्यावा, अशी मागणी करून कापूस लिलाव बंद पाडला. त्यासंदर्भात समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांचेशी संपर्क साधला असता, कृउबाचे संचालक, शेतकरी व व्यापार्‍यांशी चर्चा करून शेतकर्‍याच्या संमतीने मार्ग काढावा असे सूचित केले. त्यानंतर शेतकरी व व्यापार्‍यांशी चर्चा करून परत लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली, अशी माहिती सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी दिली. तसेच त्यांनी शासनाने सीसीआय मार्फत कापूस खरेदी संदर्भात नोंदणीकरिता उपलब्ध करून दिलेले अ‍ॅपमधील प्रक्रिया गुंतागुंतीची असल्यामुळे शेतकर्‍यांना नोंदणीमध्ये खुप मोठ्या अडचणी येत आहे.adv kothari तसेच सततधार्‍या पावसामुळे कापूस ओला झाल्यामुळे कापसाच्या प्रतीमध्ये फरक आला असून सद्यस्थितीत वेचणी केलेल्या कापसामध्ये ओलाव्याचे प्रमाण साधारणतः २० ते २२ टके आहे. ओलावा असल्यामुळे कापसाची साठवणूक करणे शय नाही. तसेच सोयाबीनच्या नापिकीमुळे शेतकर्‍यांना आर्थिक निकड भागविण्याच्या दृष्टीने वेचणी केलेला कापूस विक्रीशिवाय पर्याय नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात आज पहिल्याच दिवशी शेतकर्‍यांनी ५२३ वाहनाद्वारे कापूस विक्रीकरिता बाजार आवारात आणला.