wardha-news यंदाचा खरीप हंगाम वर्धा जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी अत्यंत कठीण ठरला आहे. सततच्या पावसाने, अतिवृष्टीने आणि त्यातून निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे जिल्ह्यात पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून याच नुकसानाचे वास्तव आता सुधारित पैसेवारीतून स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्याची खरीप हंगामातील सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आली असून त्यानुसार १३४१ गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत आली आहे. यावरून जिल्ह्यातील नुकसानग्रस्त क्षेत्र किती मोठे आहे हे अधोरेखित होते. खरीप हंगामानंतर प्राथमिक, सुधारित आणि अंतिम पैसेवारी जाहीर करते. प्राथमिक पैसेवारी ही अंदाजावर आधारित असते तर तहसीलदारांकडून आलेल्या अहवालानुसार सुधारित पैसेवारी ठरवली जाते. शासनाच्या नियमांनुसार, ज्या क्षेत्राची पैेसेवारी ५० पैशांखाली असते. त्या भागात नैसर्गिक आपतीग्रस्त घोषित करून शासकीय मदत, सवलती आणि अनुदाने लागू केली जातात. तहसीलदारांनी आपल्या तालुयातील नुकसानग्रस्त क्षेत्राचा तपशीलवार अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला. wardha-news त्यानंतर तालुकानिहाय सुधारिक पैसेवारी जाहीर करण्यात आली. जिल्ह्याची सरासरी सुधारित पैसे ४७ पैसे इतकी निघाली आहे. सोयाबीन आणि कापूस या दोनप्रमुख पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. सोयाबीनवर रोगांचा प्रादूर्भाव झाल्याने अनेक शेतकर्यांनी पिकाची कापणीही केली नाही. कापसाचे उत्पादनही घटले आहे. कारण त्यावरच शासकीय मदतीचे पुढील धोरण अवलंबून असेल. वर्धा जिल्ह्यातील खरीप हंगाम पूर्णपणे आपत्तीग्रस्त ठरला आहे.