चिचंगुडी येथे ‘रोल प्रकल्प’ तर्फे भव्य दिपावली सोहळा

25 गावांच्या आरोग्य रक्षिकांना साहित्य वाटप

    दिनांक :10-Nov-2025
Total Views |
आलापल्ली, 
roll-project-at-chingudi चिचंगुडी येथे ’‘रोल प्रकल्प’ यांच्या वतीने आरोग्य रक्षिकांसाठी खास दिपावली भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पेरमिली सर्कल क्षेत्रातील तब्बल 25 गावांच्या आरोग्य रक्षिकांनी या कार्यक्रमाला उत्साहाने उपस्थिती लावली.
 
 
roll-project-at-chingudi
 
ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी अहोरात्र झटणार्‍या या आरोग्य रक्षिकांच्या महत्त्वपूर्ण योगदानाला सलाम करत, संस्थेच्या वतीने त्यांना दिपावलीची अमूल्य भेट देण्यात आली. यामध्ये खास दिवाळी फराळ, सुंदर साडी, आणि आगामी हिवाळ्याच्या पृष्ठभूमीवर उबदार दुलई (ब्लँकेट) यांचा समावेश होता. यासोबतच, हिवाळ्यात उद्भवणार्‍या सामान्य आरोग्य समस्या लक्षात घेऊन त्यांना प्राथमिक औषधींचे वितरण देखील करण्यात आले. roll-project-at-chingudi आरोग्य रक्षिकांना त्यांच्या कामात प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या गरजांची पूर्तता करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमाला रोल संस्थेचे अध्यक्ष रमेश पटेल, प्रांत सेवा प्रमुख सुनील मेहर, जिल्हा संघचालक सुरेश गंडमवार, डॉ. सुरेश डंबोळे व इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
 
आरोग्य रक्षिक या ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा कणा आहेत. त्यांची सेवा अमूल्य आहे आणि या दिपावलीनिमित्त त्यांचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. हा दिपावली भेट कार्यक्रम ‘रोल प्रकल्प’ आणि पेरमिली सर्कल मधील आरोग्य रक्षिक यांच्यातील सामंजस्य आणि सहकार्याचे उत्तम उदाहरण ठरला. ग्रामीण भागातील आरोग्य सेवेत महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या महिलांचा हा सन्मान सोहळा उपस्थित सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाचे संचालन प्रदिप देशमुख यांनी तर आभार हेमंत राठी यांनी मानले. roll-project-at-chingudi यावेळी मानो आत्राम, लीला विडपी, कमलेश अरका, श्रवण सिलमवार, स्वाती दिनेश येनगंटिवार, संस्कार पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका पुजा सुकेपाकवार, विजय सुकेपाकवार, गणेश बोडावर यासह संस्थेचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.