डॉ. पुसदकरांच्या उपचाराने ५५ रुग्णांना पुन्हा आयुष्याचा आधार!

    दिनांक :10-Nov-2025
Total Views |
नागपूर,
Dr. Pusadkar डॉ. पुसदकर यांनी पुन्हा एकदा आरोग्यसेवेतील आपली निष्ठा आणि कौशल्य सिद्ध केले आहे. त्यांच्या विशेष “विद्ध कर्म” या उपचारपद्धतीद्वारे तब्बल ५५ रुग्णांना चालण्याची, बसण्याची आणि उठण्याची क्षमता परत मिळाली आहे. या रुग्णांपैकी अनेकांना अपघातानंतर शरीर हलवणे कठीण झाले होते, तर काहींना दीर्घकालीन वेदनांमुळे सामान्य जीवन अशक्य झाले होते. परंतु डॉ. पुसदकर यांच्या उपचारांमुळे या सर्वांना नवसंजीवनी लाभली.
 
Dr. Pusadkar
 
“विद्ध कर्म” ही एक पारंपरिक पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रभावी चिकित्सा पद्धत असून, शरीरातील विशिष्ट बिंदूंवर उपचार करून नैसर्गिक ऊर्जेचे पुनरुज्जीवन करण्यात येते. Dr. Pusadkar रुग्णांच्या चेहऱ्यांवरचा आनंद आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना पाहता, हे यश निश्चितच प्रेरणादायी आहे. स्थानिक नागरिक, समाजसेवक आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी डॉ. पुसदकर यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
सौजन्य: सारंग टोपरे, संपर्क मित्र