ट्रॅक्टरखाली दबून चालकाचा मृत्यू

बारव्हा गावातील घटना

    दिनांक :10-Nov-2025
Total Views |
लाखांदुर,  
driver-crushed-under-tractor धान कापणीसाठी जात असलेल्या महिला मजुरांच्या समूहाला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटून चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना १० नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ८ वाजता तालुक्यातील बारव्हा गावात घडली.
 
driver-crushed-under-tractor
 
या घटनेत पारडी (ता. लाखांदुर) येथील उमेश धर्मपाल किरसान (३२) या ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला. पोलिस सूत्रांनुसार, घटनेच्या दिवशी मृतक उमेश किरसान पारडी येथील मनोज हुंकरे यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरने बारव्हा गावाच्या दिशेने जात होता. बारव्हा येथील युनिक कॉलेज परिसरातील वळणावर धान कापणीसाठी जात असलेल्या महिला मजुरांच्या समूहाला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले. यावेळी ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडांना धडकून उलटला व चालक ट्रॅक्टरखाली दबला. या अपघातात चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मृतकाचे नातेवाईक तसेच दिघोरी / मो येथील पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. driver-crushed-under-tractor सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.