मुंबई,
Eknath Shinde's promise to his sisters राज्यात आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 'लाडकी बहिण योजना' संदर्भात मोठ विधान केल आहे. ठाणे आणि सांगली येथे झालेल्या कार्यक्रमांत ते बोलत होते. शिंदे पुढे म्हणाले की, राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली 'लाडकी बहिण योजना' कायम राहणार आहे. ही योजना टिकवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि महिलांना यातून मोठा दिलासा मिळेल. ही योजना बंद होणार नाही, त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न सरकार करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
संग्रहित फोटो
तसेच त्यांनी महिलांकडून मिळालेल्या प्रचंड पाठिंब्याबद्दल आभार मानले आणि नव्या कार्यकर्त्यांना संदेश दिला की, या पक्षात जो काम करेल, तो नक्की पुढे जाईल. राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असताना शिंदेंच्या या विधानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. लाडकी बहिण योजनेबाबत त्यांनी दिलेला हा आश्वासक शब्द महिलांसाठी दिलासा देणारा ठरला असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घोषणेला राजकीय अर्थही प्राप्त झाला आहे.