वर्धा जिल्ह्यात इलेट्रिक वाहने वाढली; चार्जिंग स्टेशनचे काय?

    दिनांक :10-Nov-2025
Total Views |
वर्धा, 
electric-vehicles-charging-stations-in-wardha पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये सातत्याने होणारी वाढ आणि इंधनाच्या खर्चामुळे नागरिकांचा खिसा खाली होत असल्याने सध्या इलेट्रिक वाहनांचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. गत वर्षभरात जिल्ह्यात इलेट्रिक वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. इलेट्रिक वाहने अधिक पर्यावरणपूरक, कमी खर्चिक आणि किफायतशीर ठरत असल्याने नागरिक त्यांना पसंतीही देत आहे. जिल्ह्यात इलेट्रिक वाहनांची संख्या वाढली असली तरी चार्जिंग सेंटर मात्र मोजकेच असल्याने अनेकदा अडचण निर्माण होते.
 

electric-vehicles-charging-stations-in-wardha
 
इलेट्रिक वाहनांकडे वळणे अनेकांसाठी अधिक फायदेशीर ठरत आहे. electric-vehicles-charging-stations-in-wardha इलेट्रिक वाहनांचे मेटेनन्स आणि देखभाल खर्च पारंपरिक इंधन वाहनांच्या तुलनेत खूप कमी आहे. इलेट्रिक वाहनांमध्ये कमी देखभाल खर्च, कमी प्रदूषण आणि ग्रीन इंजीनचा वापर यामुळे हे वाहन पर्यावरणासाठी देखील फायदेशीर ठरत आहेत. इलेट्रिक वाहनांसाठी वर्धा शहरात ९ ठिकाणी चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचा मानस वर्धानगरपालिकेचा आहे. तत्कालीन मुख्याधिकारी राजेश भगत यांच्या कार्यकाळात त्या दृष्टीने काही कामेही झाली. पण अद्यापही चार्जिंग स्टेशन सुरू न झाल्याने चार्जिंग स्टेशन केवळ कागदावरच होत आहे काय, असा सवालही सध्या नागरिकांकडून विचारला जात आहे. जिल्ह्यात इलेट्रिक वाहनांची संख्या वाढली आहे. बाजारात कमी किमतीच्या वाहनांची मागणी अधिक आहे. त्यामुळे भविष्यात इलेट्रिक वाहने आणखी लोकप्रिय होण्याची शयता आहे. पर्यावरणाचे रक्षण, इंधनाची बचत आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणे हे इलेट्रिक वाहनांच्या वापराचे मुख्य कारण ठरत आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील नागरिकांनी २३ हजार ४१२ वाहनांची खरेदी केली. यात ३ हजार ५२२ इलेट्रिक वाहनांचा समावेश आहे. तर सुरू असलेल्या आर्थिक वर्षातील गत ९ महिन्यात जिल्ह्यात १५ हजार ४०५ नवीन वाहनांची नोंदणी झाली. यात २१३० नवीन इलेट्रिक वाहनांची भर पडली आहे.