explosion-in-car-near-red-fort-in-delhi दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये मोठा स्फोट झाल्याने घबराट पसरली आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ एका कारचा स्फोट झाल्याचे वृत्त आहे. स्फोटानंतर ३ ते ४ वाहनांनाही आग लागली. दिल्ली अग्निशमन विभागाने सांगितले की, स्फोटात वाहनांचेही नुकसान झाले आहे. स्फोटाचे फोटो भयानक आहेत. १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर २४ जण जखमी झाले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तर मुंबईत हाय अलर्ट जारी झाला आहे.
सोमवारी Delhi Blast संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ एका कारचा स्फोट झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ ही घटना घडली. स्फोटानंतर इतर तीन ते चार वाहनांनाही आग लागली. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. परिसराला वेढा घालण्यात आला आहे. explosion-in-car-near-red-fort-in-delhi अधिकाऱ्याने सांगितले की, अग्निशमन विभागाला घटनेची माहिती सायंकाळी ७:०५ वाजता मिळाली.
सौजन्य : सोशल मीडिया
दिल्लीचे पोलिस आयुक्त सतीश गोलछा यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आज संध्याकाळी सुमारे ६.५२ वाजता लाल किल्ल्याजवळ एक संथ गतीने जाणारे वाहन लाल दिव्याजवळ थांबले. काही क्षणांतच त्या वाहनात जोरदार स्फोट झाला. स्फोटाच्या तीव्रतेमुळे आसपास उभ्या असलेल्या इतर वाहनांचेही नुकसान झाले. सर्व तपास यंत्रणा, एफएसएल (फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी) आणि एनआयए (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) घटनास्थळी पोहोचल्या आहेत. या स्फोटात काही लोकांचा मृत्यू झाला असून काही गंभीर जखमी Delhi Blast झाले आहेत. परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.”घटनेनंतर परिसर सील करण्यात आला असून रहदारी वळवण्यात आली आहे. बचावकार्य सुरू असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेबाबत तातडीने माहिती घेतली असून दिल्ली पोलिस आणि तपास यंत्रणांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घटनेबाबत माहिती घेतली असून तातडीच्या कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.
या स्फोटामुळे राजधानीत सुरक्षेची स्थिती तणावपूर्ण झाली आहे. लाल किल्ला परिसरातील सर्व प्रवेशद्वारांवर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तपास यंत्रणा या स्फोटाचा दहशतवादी हल्ला म्हणून विचार करत असून प्राथमिक तपास सुरू असल्याचे सूत्रांकडून कळते.संध्याकाळी घडलेल्या या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि छायाचित्रे व्हायरल होत असून प्रशासन नागरिकांना अफवा न पसरवण्याचे आवाहन करत आहे.
राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर संपूर्ण देशभरात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या घटनेनंतर शेजारच्या उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील सर्व प्रमुख धार्मिक स्थळांवर सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले आहेत. विशेषतः वाराणसी, अयोध्या, मथुरा, प्रयागराज आणि लखनौमधील धार्मिक स्थळांभोवती पोलिस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे.उत्तर प्रदेश पोलिस मुख्यालयाने सर्व जिल्हा पोलिस अधीक्षकांना तातडीची अॅडव्हायजरी जारी करत गर्दीच्या ठिकाणी गस्त वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी, मंदिर परिसरातील तपासणी नाके आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत