कारागृहात दारू आणि नाश्त्यासह कैद्यांचा धिंगाणा

    दिनांक :10-Nov-2025
Total Views |
बेंगळुरू,
Inmates riot in Bengaluru jail बेंगळुरू मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी अनधिकृत पार्टी करत असल्याचे एक व्हायरल व्हिडिओ चर्चेत आला आहे. या व्हिडिओत कैदी दारू आणि नाश्त्याचा आस्वाद घेत एकमेकांसोबत नाचत-गाणे गाताना दिसत आहेत. डिस्पोजेबल ग्लास आणि कापलेल्या फळांच्या तसेच तळलेल्या शेंगदाण्यांच्या प्लेट्स पार्टीत दिसत आहे. चार दारूच्या बाटल्याही स्पष्ट दिसत होत्या. काही कैदी गाण्यांच्या तालावर नाचताना दिसत आहेत.
 
 

Inmates riot in Bengaluru jail 
या व्हायरल व्हिडिओची सध्या पुष्टी झालेली नाही, परंतु सोशल मीडियावर यापूर्वीही अशा प्रकारचे व्हिडिओ दिसले आहेत, ज्यात कैदी तुरुंगात टीव्ही पाहताना किंवा अँड्रॉइड फोन वापरताना दिसले आहेत. सूत्रांच्या माहितीप्रमाणे, एका क्लिपमध्ये बलात्काराचा दोषी उमेश रेड्डी मोबाईल फोन वापरताना दिसत असून त्याच्या बॅरेकमध्ये टीव्ही सेट बसवण्यात आले होते.
 
 
कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांनी बेंगळुरू मध्यवर्ती कारागृहातील या अनियमिततेला गांभीर्याने घेतले असून अतिरिक्त पोलिस महासंचालक बी. दयानंद यांच्याकडून अहवाल मागवला आहे. जर अहवालात काही त्रुटी आढळल्या तर संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मंत्री परमेश्वर म्हणाले, जर अहवाल समाधानकारक नसेल तर स्वतंत्र समिती स्थापन करून सुधारात्मक उपाययोजना केल्या जातील. अशा प्रकारच्या घटनांची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये. गृहमंत्र्यांनी एडीजीपींना निर्देश दिले आहेत की अनियमिततेसाठी जबाबदार अधिकाऱ्यांची ओळख करून त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई करण्यात यावी.