शेलुबाजार ग्रामपंचायतचा गलथान कारभार

पुलाच्या दुरुस्तीऐवजी रस्त्यावर टाकला घनकचरा

    दिनांक :10-Nov-2025
Total Views |
मंगरुळनाथ,
shelubazar-gram-panchayat तालुक्यातील शेलुबाजार येथे आठवडी बाजाराला जोडणार्‍या अडान नदीवरील पुलाची दुरुस्ती करणे आवश्यक असताना ग्रामपंचायत प्रशासनाकडून नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. इतकेच नव्हे, तर पुलाची दुरुस्ती करण्याऐवजी याच पुलावरील रस्त्यावर ग्रामपंचायतीकडून घनकचरारा टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामदैवत सतीआई मंदिराकडे जाण्याचा रस्ता असल्याने भाविकांना रस्त्यावरील घाण कचरा तुडवत जावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
 
 
shelubazar-gram-panchayat
 
ग्रामपंचायतचे अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बेजबाबदारपणामुळे संपूर्ण गावपरिसरात दुर्गंधीयुक्त वातावरण पसरले असून, रस्त्याने ये-जा करणार्‍या नागरिकांना आणि वाहनचालकांना नाक दाबून ये जा करावी लागत आहे. विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. अडाण नदीवरील हा पूल शेलुबाजारच्या आठवडी बाजाराला जोडणारा मुख्य मार्ग आहे. shelubazar-gram-panchayat या पुलाची दुरावस्था झाली असून, त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत होती. मात्र, ग्रामपंचायत पंचायतने या मागणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. ग्रामपंचायत प्रशासनाने या रस्त्यालाच ’डम्पिंग ग्राउंड’ बनवत रस्त्यावरच घनकचरा टाकला आहे. यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती नागरिकात पसरली आहे. ग्रामपंचायतीच्या या भोंगळ कारभारामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.पुलाची दुरुस्ती तर होतच नाही,पण आता घनकचरा टाकून नागरिकांचे आरोग्य धोयात आणले जात आहे. प्रशासनाने हा कचरा तात्काळ उचलून रस्ता मोकळा करावा अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांनी या प्रकाराची तात्काळ पाहणी करणे आवश्यक आहे.