नागपूर,
Shri Pandurangeshwar Mandir श्रीपांडुरंगेश्वर शिव मंदिरात ५ नोव्हेंबरपासून सुरू झालेली श्रीराम कथा आज ५वे पुष्प कथाकार श्री संपुर्णनंद यांनी सादर केली. श्रीराम-जानकी स्वयंवर, विवाह सोहळा आणि बिदाई अत्यंत उत्साहात पार पडली. बालक आणि बालिकेच्या रूपात श्रीराम व जानकीची पारंपारिक वेशभूषा कौतुकास्पद होती. अनेक भाविकांनी पूजन, पादप्रक्षालन आणि अहेर-बिदागी अर्पण केले. कार्यक्रमाची यथोचित व्यवस्था तुषार कवीश्वर, जेंद्र कोहळे, राजीव भूत, मुरलीधर कुहेकर आणि मंदिर पूजारी मुकुंद डबली यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
सौजन्य: विकास देशपांडे, संपर्क मित्र