विवाहित रिक्षाचालकाच्या प्रेमात पडली विद्यार्थिनी

- शेवटी आईच्याच तक्रारीवरुन गुन्हा दाखल

    दिनांक :10-Nov-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर
student-falls-in-love-with-rickshaw-driver बाराव्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी स्वतःच्या घरी भाड्याने राहणाऱ्या 35 वर्षीय विवाहित रिक्षाचालकाच्या प्रेमात पडली. कुटुबियांना काेणतीही कुणकुण न लागू देता दाेघांचेही प्रेमसंबंध सुरु झाले. मात्र, ही बाब रिक्षाचालकाच्या पत्नीला आणि विद्यार्थिनीच्या आईवडिलांना कळली. या प्रकरणी विद्यार्थिनीच्या आईच्या तक्रारीवरुन रिक्षाचालकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
 
 
student-falls-in-love-with-rickshaw-driver
 
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शांतीनगर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत आईवडिलांसह राहते. तिच्या घरी रिक्षाचालक आराेप नकुल हा भाड्याने राहायला आला. ताे पत्नीसह तेथे राहत हाेता. त्याची नजर घरमालकाची एकुलती मुलगी तनिष्का (बदललेले नाव) हिच्यावर पडली. ती बाराव्या वर्गाची विद्यार्थिनी असून तिला अनेकदा नकुल तिला साेडून देत हाेता. तसेच घरी कुणी नसताना ताे तनिष्काशी गप्पा करीत हाेता. त्यामुळे दाेघांची चांगली गट्टी जमली. student-falls-in-love-with-rickshaw-driver त्याने तिचा माेबाईल क्रमांक घेतला आणि तिच्याशी चॅटिंग सुरु केली. विवाहित असलेल्या रिक्षाचालकाने तनिष्काला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पत्नीच्या चाेरुन ताे तिच्याशी बाेलत हाेता. यादरम्यान, दाेघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. घरात कुणी नसताना दाेघेही एकमेकांसाेबत वेळ घालवत हाेते.
आईमुळे उघडकीस आले प्रेमप्रकरण
आई घराबाहेर गेल्याचे बघून तनिष्काने नकुलला भेटायला घरात बाेलावले. त्यावेळी त्याची पत्नीसुद्धा बाहेर गेली हाेती. त्यामुळे संधी साधून दाेघेही एकमेकांची गळाभेट घेत हाेते. दरम्यान, तनिष्काची आई अचानक घरी आली. तिला मुलीसह घडत असलेला प्रकार दिसला. तिने बदनामी हाेऊ नये म्हणून नकुलला हटकले. यानंतर मुलीचा नाद साेडण्याची तंबी दिली.
शेवटी पाेलिसांत केली तक्रार
नकुलच्या पत्नीला या प्रकाराबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर तनिष्काचीही समजूत घालण्यात आली. मात्र, दाेघेही ऐकायला तयार नव्हते. त्यांच्या चाेरुन भेटी व्हायला लागल्या. student-falls-in-love-with-rickshaw-driver शेवटी तनिष्काच्या आईने मुलीच्या भविष्याचा विचार करता शांतीनगर पाेलिस ठाणे गाठले. पाेलिसांना नकुल आणि तनिष्काबाबत माहिती दिली. अल्पवयीन असलेल्या तनिष्काच्यावतीने तिच्या आईने तक्रार दिली. तक्रारीवरुन पाेलिसांनी गुन्हा दाखल करुन रिक्षाचालक नकुलला अटक केली.